कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये माही बंगला, (कासमभाई शेख यांचे निवासस्थान), प्लॉट नं ३५, गुरुनानकनगर, येथे झालेल्या कार्यशाळेत हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली .
पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅन्टोन्मेंट विधासभा मतदारसंघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा , पुणे शहर उपाध्यक्ष कसमभाई शेख , कॅन्टोन्मेंट विधासभा मतदारसंघ महिला अध्यक्ष मीना पवार , माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ , आतिक मोमीन , लुकमान खान ,शैलेश म्हेत्रे , युसूफ शेख स्वीकृत सदस्य भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय यांच्या हस्ते हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे, ओळख पत्रे देण्यात आली यावेळी हजारी प्रमुख व्यवस्थेतील कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला. ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा . दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल ‘ चे कार्य अचूक करावे . विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे