यावेळी अॅड .म . वि . अकोलकर पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले.
शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अॅड .म . वि . अकोलकर पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे , पार्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शशिकांत तापकीर ,नगरसेवक विनायक हनमघर ,शिवलाल भोसले , माजी नगरसेवक श्याम मानकर , आबा रासकर , सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे , मृणालिनी वाणी यांच्या हस्ते हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे , ओळख पत्रे देण्यात आली.
यावेळी खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला . ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा . दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल ‘ चे कार्य अचूक करावे . विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
अॅड .म . वि . अकोलकर मार्गदर्शन करताना म्हणाले ,’ हजारी प्रमुख हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा असतो. पक्षाची ध्येय ,धोरणे , काम थेट मतदारांपर्यंत पोहचविणारा महत्वाचा दुवा असतो. हजारी प्रमुखांचे काम हे महत्वाचे असते. त्यांनी चांगले काम केले तर त्याचा फायदा निश्चितच पक्षाला होतो. त्यासाठी सर्वानी झटून काम केले पाहिजे ‘.
पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. हजारी प्रमुखांच्या कामाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले , ‘ मतदार संघातील पक्षाने नेमलेल्या जबाबदार कार्यकर्त्यांनी प्रथम जुनी यादी मिळवावी , त्याचा अभ्यास करावा , मतदारसंघाचे विभाग पाडावेत, अश्या वेगवेग्ळ्या याद्या करून त्याप्रमाणे नियोजन करून मतदारांच्या भेटी घ्याव्यात’.