पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बँकांसमोरील रांगेतील नागरिकांना पाणी वाटप
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बँकांमध्ये पैसे भरणार्या आणि काढणार्या नागरिकांना पाणी वाटप करण्यात आले. पुणे शहरात बँकांच्या बाहेर प्रचंड गर्दीचा त्रास सहन करणार्या सामान्य नागरीकांना पाणी वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरात ठिक ठिकाणी राबवण्यात आला. टिळक रोडवरील पक्ष कार्यालयासमोर स्टेटबँक, बँक ऑफ ईंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र (धनकवडी शाखा) आदी बँकांसमोर रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या नागरीकांना पाणी वाटप करण्यात आले. पक्षाचे शहर सरचिटणिस माऊली दारवटकर, संतोष जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
केंद्र सरकारच्या प्रसिध्दीच्या हव्यासापोटी घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. अशा निर्णयानंतर परिणामांचा अभ्यास करून उपाय योजना राबवण्यात सरकार कमी पडले असल्याची टिका दारवटकर यांनी केली. व्यापारी, कामगारवर्ग, कर्मचारी यांना या निर्णयामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर बँकांसमोर रांगेत उभे राहणार्या सामान्य नागरीकाला दिलासा म्हणुन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पाणी बाटल्या वाटण्यात आल्या.
या प्रसंगी अशोक राठी, शशिकांत तापकीर, सचिन पासलकर, जयदेव इसवे, अन्वर शेख, संजय गाडे, राहुल पोटे, शहाजी आडसुळ व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.