बँकांसमोर रांगेतील नागरिकांना पाणी आणि चहा वाटप
पुणे-केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यापारी, कामगारवर्ग, कर्मचारी यांना या निर्णयामुळे दिवसभर बँकांसमोर रांगेत ऊभे राहून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सामान्य नागरीकाला दिलासा म्हणुन पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे बोपोडी येथील यूनियन बँक येथे पिण्याचे पाणी व चहा वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक श्रीकांत पाटिल, सुभास पाडळे, अभिषेक बोके, आश्विन जाधव , प्रभात सुलगे, दिनेश जाधव, अमित जावीर, सुजीत म्हस्के व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संजोजन अमोल उत्तम जाधव(सरचिटणीस – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर) यांनी केले.