पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महागाई विरोधात आज शहर उपाध्यक्ष अशोक राठी आणि नगरसेवक रवींद्र माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
सततच्या महागाईच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी पुणेकरांच्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पालकमंत्री व अन्न-धान्य पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. कसबा गणपती मंदिर येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
पुणे शहरातील जनता महागाईने अगोदर त्रस्त असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर फराळासाठी लागणारी हरभराडाळ , तूरडाळ, साखर व सर्वच धान्य प्रचंड महागले आहे . सततच्या या महागाईमुळे पुणेकरांचे बजेट कोलमडले आहे . यासाठी पुणेकरांच्या वतीने महागाईच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले.