महिला स्वयंरोजगार ,संगणक प्रशिक्षण ,वाहन प्रशिक्षण उपक्रमांना मिळाला हक्काचा निवारा !
पुणे :
संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या सुदुंबरे या गावात महिला अस्मिता भवनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा महिंद्रा इंटरट्रेड लि. चे व्यवस्थापकीय संचालक सुमित इस्सार यांच्या प्रमुख उपस्थित झाला.
या अस्मिता भवन ‘ मध्ये महिलांसाठी संगणक प्रशिक्षण ,वाहन प्रशिक्षण ,स्वयंरोजगार प्रशिक्षण असे उपक्रम सुरु झाले आहेत . त्याची माहिती मान्यवरांनी घेतली .
या वेळी बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘गावातील महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणासाठी हि संकल्पना मी सुरवातीलाच मांडली होती . त्याला भवन बांधून कोंदण देण्याचे काम झाले आहे . महिला अस्मिता भवनाचे बांधकाम महिंद्रा कंपनीने सामाजिक विचारातून केले . आज ह्या वास्तुचे लोकार्पण करताना आनंद होत आहे.
या अस्मिता भवनात गावातील महिला ह्या एकत्र येतील व्यावसायिक प्रशिक्षण घेतील आणि सामुहिकरित्या व्यवसाय करतील. मला विश्वास आहे सुदुंबरे गावातील महिला निश्चितच या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचा,कुटुंबाचा आर्थिक विकास साध्य करतील. ‘
गावात झालेला बदल गावातील विद्यार्थ्यांनी चित्रकलेद्वारे दाखवले . या चित्र प्रदर्शनाची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली . यावेळी विजय अरोरा ,दिवाकर श्रीवास्तव ,लक्ष्मण महाले ,जोगेंद्र कट्यारे (मावळ चे तहसीलदार ),शरद पाटील (मिरज चे तहसीलदार ),संगीता भांगे (सरपंच ),बाळकृष्ण गाडे (उप सरपंच ),संजीवनी जोगळेकर उपस्थित होते

