राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या अल्पसंख्याक व सामाजिक न्याय विभाग यांची आढावा बैठक संपन्न

Date:

पुणे :
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या अल्पसंख्याक व सामाजिक न्याय विभागची आढावा बैठक शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली
 या आढावा बैठकीला  माजी महापौर मोहनसिंग राजपाल, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इक्बाल शेख, पक्षाच्या पुणे शहर सामाजिक न्याय विभागचे अध्यक्ष आनंद रिठे व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या ,”विशिष्ठ समाजातील युवक वर्गाला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे. आपला देश हा धर्मनिरपेक्षतेची कास धरणारा देश आहे. पण सध्याचे वातावरण पाहता घटनेची पायमल्ली होत आहे. जात, धर्म यावरुन सामाजिक तेढ निर्माण केले जात आहे. यासाठी तरुण वर्गाला भुलवण्याचे काम काही संघटनांमार्फत चालू आहे . परंतु, मला सांगायला अभिमान वाटतो की आजचे बहुतांशी तरुण हे सुध्दा धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र देशात आहे.या युवाशक्तीला एकत्र करण्याची जबाबदारी आपली आहे.
तसेच अल्पसंख्यकांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचायला हव्यात यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची यंत्रणा भक्कम करा. यासाठी कार्यकर्ते मेळाव्यांचे आयोजन करायला हवे.
विविध विषयांवर कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा अभ्यास व्हावा, एखाद्या विषयाचे प्राथमिक माहीती मिळावी यासाठी येत्या काळात शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यायला हवा. तरच परिवर्तनास सुरुवात होईल.”
index
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...