एकूण 7 कामांचा उद्घाटन समारंभ पार पडला .
कार्यक्रमानंतर खासदार वंदना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या .त्या म्हणाल्या,’ या वैद्यकीय महाविद्यालयातून राज्यात सर्वदूर भागात डॉक्टर्स सेवेसाठी जातात . त्यांच्या विद्यार्थी दशेत समाजाने त्यांना मूलभूत दैनंदिन सोयी -सुविधा देण्याची गरज आहे . चांगले भावी वैद्यकीय व्यावसायिक घडवायचे असतील तर त्यांच्या शिक्षण काळातील समस्याही सोडविल्या पाहिजेत ‘
विद्यार्थ्यांमधुन अनिकेत माने व अतुल ढाकणे यांनी भाषण केले . अतुल ढाकणे म्हणाले ,’खासदार वंदना चव्हाण यांनी केलेल्या उपयुक्त कामांमुळेमधे वसतिगृहात मूलभूत सोयी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याची भावना असून भविष्यात सर्व डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी कटिबद्ध राहतील व सर्व विद्यार्थ्यांनी समाजसेवा करण्याची प्रेरणा घेतली आहे .