‘वायसीएम’च्या धर्तीवर खडकवासला मतदारसंघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करा -सुप्रिया सुळे

Date:

पुणे-बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे महापालिकेच्या खडकवासला हद्दीत येणाऱ्या शहारी भागात ‘वायसीएम’च्या धर्तीवर सर्व सुखसोयींनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हे पत्र विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक प्रकाश कदम,सचिन दोडके, बाळा धनकवडे, नगरसेविका अमृता बाबर, अश्विनी भागवत, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या उपस्थितीत आयुक्तांना देण्यात आले.

खडकवासला मतदारसंघात सातत्याने नागरिकीकरण वाढत आहे. याशिवाय गरीब लोकांनाही मोफत अथवा अत्यंत अत्यल्प दारात आरोग्य सुविधा मिळतील. नागरिकांना सोयीचे पडेल, अशा ठिकाणी सर्व सोयींनीयुक्त असे रुग्णालय असणे गरजेचे आहे. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांना उच्च दर्जाच्या सर्व आरोग्य सुविधा वेळेत मिळणे सोईचे होईल.

या रुग्णालयासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे. या भागात हे रुग्णालय तातडीने होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...