पुणे- खासदार आणि माजी महापौर वंदना चव्हाण यांचीच राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली आहे . चव्हाण याच शहर अध्यक्ष पदावर काम पाहतील, असे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिली . वंदना चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी साधारण मागील पाच वर्षापासून आहेत.महापालिका आयुक्त कुणालकुमार यांच्याशी त्यांचा मध्यंतरी वादंग झाला होता. पण कुणाल कुमार यांनी माफी मागितली नव्हतीच तरीही हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता वंदना चव्हाण यांनी आपले कामकाज आपल्याच पद्धतीने सुरु ही ठेवले होते
शहरातील काँग्रेस आणि भाजपच्या शहर अध्यक्ष बदलानंतर राष्ट्रवादीचा देखील शहर अध्यक्ष बदलण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी 2 मे रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. मात्र, यावर शरद पवार निर्णय घेतील असे सांगण्यात आले होते.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने काही दिवसांपूर्वी शहर अध्यक्षपदी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि पुणे जिल्हा अध्यक्षपदी संजय जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपतर्फे शहर अध्यक्षपदाची जबाबदारीजुने जाणते माजी नगरसेवक योगेश गोगावले यांच्यावर देण्यात आली.या दोन्ही पक्षांच्या शहर अध्यक्षपदाच्या बदलानंतर राष्ट्रवादीचा देखील शहर अध्यक्ष कोण असेल याबाबत उत्सुकता होती .