… वाहून गेलेल्या संसाराला मिळाला हातभार ! अश्विनी कदम मित्र परिवारातर्फे संसारोपयोगी साहित्यांचे वाटप

Date:

पुणे :मुठा कॅनॉल फुटला आणि होत्याचे नव्हते झाले, अनेकांचा  संसारच वाहून गेला. नेसत्या वस्त्रानिशी वाचलेले अनेक कुटुंबीय पुढे काय ? या प्रश्नाने हतबल झाले. शासकीय पातळीवर मदतीचे प्रयत्न सुरु असताना स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम सरसावल्या आणि  अनेकांच्या वाहून गेलेल्या संसाराला आधार देण्यासाठी संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करून छोटासा ;पण भरीव दिलासा दिला. त्यासाठी स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून आपत्तीग्रस्त कुटुंबियांना मदत करा हे त्यांनी सोशल मीडियावर  केलेले आवाहन प्रभावी ठरले आणि अनेकांनी या उपक्रमात  उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मुठा कॅनॉलला भगदाड पडल्याने दांडेकर पूल परिसरातील अनेकांचे घरेच काय संपूर्ण संसारच वाहून गेला.या आपत्तीग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काही तरी करावे या विचाराने स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. इतकेच नाही तर वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच त्यांनी सोशल मीडियावर आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्याचे आवाहन केले.त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसावर खर्च होणाऱ्या रकमेतून  संसारोपयोगी भांडी , साहित्य घेण्यात आले आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दांडेकर पूल परिसरातील अनेक कुटुंबियांना या संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. ज्या वस्तूंची  गरज आहे ती मिळताच अनेक महिलांचे चेहरे आनंदी दिसले. छोटासा ;पण महत्वाचा हातभार आमच्या संसाराला लावल्याबद्दल त्या महिलांकडून  कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक नगरसेविका प्रिया गदादे ,सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन कदम, मनाली भिलारे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...