पुणे : आज जागतिक महिला दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून “मूक आंदोलन “केले. या आंदोलनात पक्षाच्या कार्यकर्त्या महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्रात स्वतंत्र गृहमंत्री नाही, काल जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विधानभवनाबाहेर पोलिसांकडुन महिलांना मारहाण होते, अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत ,यामुळे निशब्द होत आज आम्ही हे “मुक आंदोलन “केले, असे पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
‘नॅशनल रेकाॅर्ड क्राईम ब्युरोने सादर केलेल्या अहवालात गेल्या वर्षी महिला अत्याचाराच्या घटना ज्या पध्दतीने वाढल्या त्यामुळे उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्र हा तिसरा क्रमांकावर आहे.विनयभंग आणि छेडछाडीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य पहिले आहे….
इतक्या मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि असुरक्षितता वाढत असताना आज एका दिवसांसाठी आनंद साजरा करायचा का ?असा प्रश्न पडतो. ‘
कदाचित आक्रोश करण्यापेक्षा या सरकारला हा आमचा “आवाज”लवकर पोहचेल.जेणेकरून महिलांसाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होऊन अत्याचाराला आळा बसेल, असे देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
कदाचित आक्रोश करण्यापेक्षा या सरकारला हा आमचा “आवाज”लवकर पोहचेल.जेणेकरून महिलांसाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होऊन अत्याचाराला आळा बसेल, असे देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

