पुणे :‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हिराबाग, टिळक रोड येथील पक्ष कार्यालयात सकाळी 10 वा.10 मि. वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण होत्या.
यावेळी अंकुश काकडे, चेतन तुपे, रवींद्र माळवदकर, व्यंकटराव अवधूत, नगरसेवक रुख्साना इनामदार, शशीकांत तापकीर, अॅड. संदीप कापरे, योगेश जगताप, विपुल म्हैसूरकर, उदयन महाले, राजू गिरे, सुनील खाटपे, इक्बाल शेख, वासंती काकडे, मनोज पाचपुते, भगवान साळुंखे, अशोक राठी, नीलेश निकम आदी उपस्थित होते.
पक्षाच्या क्रीडा सेल च्या वतीने पर्यावरण संवर्धन सायकल स्वारी करणाऱ्या ८ सायकल स्वारांचा सत्कार करण्यात आला.