शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा विभागच्या वतीने खेळाडूंचा सत्कार
पुणे :
खासदार शहराध्यक्ष अॅड.वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा विभागच्या वतीने खेळाडूंचा सत्कार, पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार व नवीन पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
हा कार्यक्रम सुरभी मंगल केंद्र, तावरे कॉलनी येथे पार पडला. याप्रसंगी सभागृह नेते सुभाष जगताप, बाळासाहेब अटल, पंडित कांबळे, नितीन कदम, सचिन पासलकर, शशीभाऊ तापकीर, बबलू जाधव, अशोक राठी, जयदेव ईसवे, मनाली भिलारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहराचे नावलौकिक वाढवणार्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व आगामी काळात त्यांनी अजून यश संपादन करावे म्हणून त्यांना प्रेरित करण्यासाठी गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती क्रीडा विभागाचे शहर अध्यक्ष विपुल म्हैसुरकर यांनी दिली. यावेळी 24 खेळाडूंचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यामध्ये रोलर स्केटिंग डान्स स्पर्धेमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले, राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त यांचा समावेश होता .
पुणे शहर क्रीडा विभागाच्या वतीने हा भव्य मतदारसंघनिहाय मेळावा प्रथमच आयोजित करण्यात आला होता . मेळाव्यामध्ये 400 कार्यकर्ते सहभागी झाले होते. मेळाव्या दरम्यान पर्वती मतदार संघातील सर्व प्रभाग अध्यक्षांची, मार्केट यार्ड ब्लॉक, सहकारनगर ब्लॉक, पर्वती ब्लॉक व पर्वती मतदारसंघातील सर्व कार्यकारिणी अशा 21 जणांच्या नेमणूका करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे व मेळाव्याचे आयोजन क्रीडा शहर अध्यक्ष विपुल म्हैसुरकर यांच्या नेतृत्वाखाली पर्वती अध्यक्ष समीर पवार, उपाध्यक्ष प्रशांत कदम,आनंद खर्डेकर,आलिम पठाण,उमेश डोलारे, शिरीष कदम,सागर रायरिकर व पर्वती मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.