शहरातील वाढते प्रदूषण याविषयी होणार चर्चा
पुणे :
शहरातील वाढते प्रदूषण हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे. दिल्लीनंतर पुण्याचा देखील नंबर लागू शकतो. या पार्श्वभूमीवर ‘अॅलर्ट’ (असोसिएशन फॉर लिडरशीप एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग) च्या वतीने ‘सीटी ‘डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर शुक्रवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता, नीतू मांडके हॉल, टिळक रोड येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘अॅलर्ट’ च्या संस्थापक खा. वंदना चव्हाण यांनी दिली.
या चर्चासत्रात सुलक्षणा महाजन (शहर व्यवस्थापनाच्या अभ्यासक, मुंबई) यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान होणार आहे.नागरीतज्ञ, विविध विभागाचे शासकीय अधिकारी आणि वक्ते या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. अनिता बेनिंजर, सुजित पटवर्धन, डॉ. अजय ओझा, मंगेश दिघे, श्री. अमरनाथ, किरण गीते सहभागी होणार आहेत.
‘सेंटर फॉर एनव्हायरमेंट एज्युकेशन’, ‘परिसर’, ‘सजग नागरिक मंच’, ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज’, ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज’, ‘नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज’, ‘सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’, ‘वनराई’, ‘लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल’ या संस्था सहभागी होतील. हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले आहे.
‘दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाच्या बातम्यांनी संपूर्ण देश हवालदिल झाला आहे. तसेच आता पुण्यात देखील वाढत्या प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीनंतर पुण्याचा देखील नंबर लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आपण ‘जागरूक राहायला हवे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व संबंधितांनी योग्य दिशेने आणि पुरेसे प्रयत्न करीत आहेत, याविषयी या महत्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे,’ असे वंदना चव्हाण यांनी सांगितले.