‘रातोरात झाडे कापण्याची प्रशासनाची कृती हा पुणेकरांचा विश्वासघात’ : खा.वंदना चव्हाण
पुणे :
पुणे विद्यापीठ रस्त्यावरील झाडे तोडण्याच्या विषयाबाबत स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्याशी चर्चा केली जाईल असे ठरलेले असताना रातोरात झाडे कापण्याची पालिका प्रशासनाची कृती हा पुणेकरांचा विश्वासघात आहे, अशी टीका खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली.
‘लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज ऐकावा हा संकेत आहे. पुणे पालिकेतील भाजपाची सत्ता झाडे वाचविणार्या नागरिकांचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही. सरकार आणि भाजपाची महापालिकेतील सत्ता पर्यावरणाविषयी असंवेदनशील आहे, ही शोकांतिका आहे,’ असे खा. चव्हाण यांनी पत्रकात म्हणले आहे.
‘पुणे पालिकेतील भाजपाची सत्ता अधिकारीच त्यांच्या अधिकारशाहीने गाजवत आहेत’, असा आरोपही त्यांनी केला असून, झाडे कापण्याच्या कृतीचा निषेध केला आहे.