पुणे- राष्ट्रवादीचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी आज चक्क मुख्यमंत्री , भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची येथे आरती केली .कोथरूडला मेट्रो प्रकल्प आणि हडपसरला कचरा प्रकल्प … कोथरूड चा कचरा डेपो जसा बंद करून त्यांना न्याय दिला मग हडपसर वर अन्याय का ? अशा स्वरूपाच्या तक्रारी करत कचरा प्रकल्पाला विरोध म्हणून हि आरती करण्यात आली .
हडपसर रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव कृती समिती कडुन हडपसर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची आरती ही प्रतिकात्मक म्हणून केली रामटेकडी येथील कचरा प्रकल्पास विरोध म्हणून सर्व हडपसर वासीय एकत्र आले आहेत.त्यांनी कृती समिती स्थापन केली. असे सांगून राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले कि ,1 ऑक्टोबर रोजी सर्व स्थानिक नागरिकांनी एकत्र येउन मोर्चा केला.आयुक्त यांना निवेदन देण्यात आले तरीही नागरिकांचा विरोध लक्षात न घेता पुणे मनपा व राज्य शासन मिळून हा प्रकल्प आमच्या वर लादत आहे.पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मारुती मंदिर हडपसर येथे बैठक झाली.ह्या बैठकी नंतर मुख्यमंत्री ह्यांच्या प्रतिमेची प्रतिकात्मक आरती करण्यात आली.
आज मारूती मंदिरात देवा समाेर या मुख्यमंत्र्यांना सद्बुध्दी देण्यासाठी साकडे घालुन खालील आरती म्हटली गांधी चौकात मुख्यमंत्र्यांची आरती उपहासात्मक.
———————————-
जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री
कचरा प्रकल्प का लादता हडपसरवरती
हिच का माया तुमची आमच्यावरती
जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री
ज्या जनतेने दिली ताकद तुम्हांला त्यांच्याच आरोग्यावर घालता का घाला
कोथरूडला आणता मेट्रो प्रकल्प
हडपसरला मात्र कचरा संकल्प
जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री
हडपसरवासी का दुर्लक्षीत केले
आम्हांला तुम्ही सावत्र समजले
आम्हांला तुम्ही लांब फेकले
आमच्याच माथी कचरा प्रकल्प लादले
आरोग्य आमचा हक्क मानावा
सुरक्षीत विकास हडपसरचा व्हावा.
हडपसरवासीयांचा ऐका हा आक्रोश
कचरा प्रकल्प हलवा आणि टाळा विनाश.
जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री