राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोटनिवडणूक प्रभाग क्र. २१ साठी उमेदवारी अर्ज दाखल धनंजय गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात
पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २१ मधील पोटनिवडणूकीसाठी आज (शनिवारी ) पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने धनंजय सूर्यकांत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल केला.
यावेळी आमदार जयदेव गायकवाड, प्रवक्ते अंकुश काकडे, निरीक्षक कृष्णकांत कुदळे, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक रवींद्र माळवदकर, नगरसेवक प्रदीप गायकवाड, माजी महापौर प्रशांत जगताप, मोहनसिंग राजपाल, उपाध्यक्ष अशोक राठी, भगवानराव वैराट व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या, ‘ही लढाई भाजपाच्या विरोधात आहे. भाजप सरकारच्या काळात देशात वाढत चाललेल्या अराजकतेमुळे संपुर्ण लोकमानसात असंतुष्टतेची भावना निर्माण होत आहे. लोकांचा कल पाहता सामान्य नागरिकांमध्ये ह्या भाजप सरकारच्या विरोधात आक्रोश अनेक प्रकारे व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही आहे आणि म्हणूनच आम्ही ही पोटनिवडणूक लढवत आहोत.’