सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेचा राष्ट्रवा
पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक : खा. वंदना चव्हाण यांची मागणी
पुणे :
या बैठकीला अशोक राठी, चेतन तुपे, निलेश निकम, रवींद्र माळवदकर, मंगेश तुपे, शंकर शिंदे, सुरेश बांदल, काका चव्हाण, शशिकांत तापकीर, पंडित कांबळे, राकेश कामठे, रुपाली चाकणकर, मनाली भिलारे उपस्थित होते.
हल्ल्याबाबत बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘अमरनाथ यात्रेवरील हल्ला भ्याड आहे. या हल्ल्याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करीत आहे. धार्मिकस्थळी, पर्यटनस्थळी होणारे असे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सरकारने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांची हिम्मत होता कामा नये अशी जरब बसवणे महत्वाचे आहे.’
सरकारने हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने बैठकीत करण्यात आली.
या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक सलीम याच्या प्रसंगावधानामुळे यात्रेकरूंचे प्राण वाचले, त्यामुळे पक्षाच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आले.