पुणे- महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खासदार अॅडव्होकेट वंदना चव्हाण यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.पुणे महापालिका निवडणूक 21 फेब्रूवारीला पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीने विजय आमचाच होणार म्हणून दावा केला होता. आज मतमोजणी झाली असून त्यापैकी 122 जागांचे निकाल सायंकाळी साडेपाच पर्यंत हाती आले आहे. त्यानुसार, राष्ट्रवादीला केवळ 28 जागांवर विजय मिळवता आला असून भाजपला 78 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीचा झालेला या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.