पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘क्रीडा सेल’च्या पदाधिकार्यांची नियुक्ती
पुणे :
पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या क्रीडा सेल च्या वतीने क्रिडा सेलच्या नियुक्ती पत्रांचे नुकतेच वाटप करण्यात आले. खासदार शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण आणि क्रिडा सेलचे शहराध्यक्ष विपुल म्हैसूरकर यांच्या हस्ते या नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेल, पुणे शहर मध्ये शहर उपाध्यक्ष पदी विठ्ठल दाभेकर, प्रशांत कदम, अब्दुल वहाब, अमित देशमुख, सरचिटणीस अलिम पठाण आणि राहुल कांबळे, तर संघटक गणेश मुरगुंड यांचा समावेश आहे.
तसेच यावेळी विधानसभा मतदार संघ अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेल शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदी निखिल भसमारे, पर्वती विधानसभा मतदार संघ अध्यक्ष समीर पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी विनायक चाचर, बबलू जाधव, संतोष बेंद्रे (कसबा ब्लॉक अध्यक्ष), युसूफ शेख (स्वीकृत नगरसेवक ), शैलेश बडदे, हर्षद बोडके उपस्थित होते.