मानकर आणि लोणकर यांच्या हाथी  पुण्याच्या राष्ट्रवादीची धुरा सोपविण्याची शक्यता 

Date:

पुणे(शरद लोणकर )- राष्ट्रवादीचा आघाडीचा जनमानसातील  नेता राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी भाजपने डाव साधून केलेल्या षड्यंत्रात कोथरूडची आमदारकी गमावल्यानंतर ,शक्तिहीन करण्याचा प्रयत्न ज्या हातांवर झाला, त्याच हातांना आता ताकद  देवून,  पुन्हा नव्या जोमाने राष्ट्रवादीचा झेंडा डौमानं फडफडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस चा शहराध्यक्ष पद या हाथी सोपविण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. एकीकडे राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष आणि दुसरीकडे महापालिकेतील गटनेता म्हणजेच  विरोधीपक्षनेता अशी दोन्ही पदांवर आता राष्ट्रवादी आपले मोहरे बसवेल असे चित्र आहे. ज्यांच्या हाथी आता पुढील २ वर्षात आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम कसे वाजवायचे याबाबतची सूत्रे असणार आहेत .सध्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आता आमदार झाल्याने शहराध्यक्षपदावर दिपक मानकर यांचे नाव जोमाने पुढे येते आहे. तर दिलीप बराटे यांना अजून विपक्ष नेते पदाचा कालावधी सांगितला नसला तरी , 1 वर्षाचा त्यांचा काल पूर्ण झाल्याने बदल करायचा असे गृहुत धरले तर या पदावर राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा लोणकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अर्थात त्यांना बाबुराव चांदेरे,विशाल तांबे या पक्षांतर्गत स्पर्धकाशी सामना करूनच या पदापर्यंत पोहोचावे लागणार आहे. शहराध्यक्ष पदासाठी मानकर यांचे नाव आघाडीवर असले तरी प्रशांत जगताप हे देखील या पदाच्या शर्यतीत आहेत .दरम्यान सत्ताधारी भाजप पाठोपाठ पालिकेत राष्ट्रवादीत होणारे हे बदल पाहता कॉंग्रेस पक्षात काही हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही . कॉंग्रेस मध्ये गटनेता पदावर अरविंद शिंदे जोमाने लढत असले तरी , आबा बागुल ,रवी धंगेकर हे दोघे या पदासाठी प्रयत्नशील नसले तरी आशेवर मात्र आहेत .आणि बदल करायचा झालाच तर अविनाश बागवे यांचे नाव त्यांच्याही पुढे आघाडीवर असणार आहे . तर तिसरीकडे ,मनसे मध्ये वसंत मोरे गटनेते आहेत. इथे मनसेचे २ च नगरसेवक असल्याने आता साईनाथ बाबरांना गट नेते पदाची संधी मिळण्यास हरकत काय असा प्रश्न उपस्थित होवू शकणारा आहे.

मानकर हे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शहराध्यक्षपदी विराजमान होतील असे चित्र होते. एवढेच नव्हे तर लोकसभा आणि त्यानंतर कोथरूड विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीसाठी ते निवडून येणारे दमदार नेते म्हणून त्यांचा गवगवा झाला होता .पण काळाची पावले उलटी पडली आणि त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्याच्या आत्महत्या प्रकरणात गोवले गेले . नुसते गोवले गेले नाही तर चक्क मोक्का लावून त्यांचा या दोन्ही निवडणुकीच्या रिंगना बाहेर ते हताश पणे बघत  बाहेर कसे राहतील याचीच जणू बडदास्त कायद्याचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत ठेवली गेली हे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सह भाजप सेनेतील कार्यकर्ते आणि नेते मंडळी हि जाणून आहेत .मानकर यांनी या कठीण काळाचा सामना मोठ्या हिकमतीने  केला , आता खडतर काल संपला आणि ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. मानकर यांच्यावर अशी वेळ आल्याने त्यांचे सर्वात प्रथम हुकले ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद .. पण आता ते पद त्यांना पुन्हा देता  येईल अशी संधी पक्षाला आणि नेत्यांना प्राप्त झाली आहे. मानकर यांचा शहराच्या राजकारणावर आणि प्रशासनावर असलेला दबदबा ,त्यांच्याकडील युवाशक्ती आणि त्यांचा वैयक्तिक अनुभव या सर्व गोष्टीचा फायदा राष्ट्रवादीला आगामी महापालिका निवडणुकीत निश्चित होईल असे दिसते आहे. या अनुषंगाने आता मानकर यांचे हात बलक्त करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद त्यांना दिले जाईल असे दिसते आहे.

विरोधी पक्षनेता हे पालिकेतील पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. चेतन तुपे पाटील यांच्यानंतर ते दिलीप बराटे यांच्याकडे आले. बराटे यांनी आआपला कार्यभार व्यवस्थित सांभाळला आहे ,अन्य पक्षांच्या गटनेत्यांवर सत्ताधारी नेत्यांशी साटेलोटे करणारे नेते म्हणून कधी कधी पाहिले जाते तसा डाग बराटे यांनी कधी स्वतःच्या प्रतिमेला लागू दिला नाही . बराटे यांनी खडकवासला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी च्या  उमेदवाराला मनापासून मदत केली नाही ;केली असती तर तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असता असा एक आरोप त्यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोड्या करू पाहणाऱ्या काहीजणांनी विशिष्ट  माध्यमांचा आधार घेत केला .पण तो साफ खोटा मानला जातो . तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार अवघ्या २ हजार मतांनी पडला असला तरी तिथे झालेले  मतदान स्थानिक आमदाराच्या निष्क्रियतेच्या विरोधात म्हणून झाले होते तिथे उमेदवाराने  काही चुकीची माणसे प्रचारकाळात जवळ केली त्याचाच फटका उमेदवाराला बसला अन्यथा किमान १० हजार मतांनी तिथून राष्ट्रवादी चा उमेदवार विजयी झाला असता असा समीक्षकांचा दावा आहे तो आजतागायत ;संबधित चुकीच्या माणसांनी ‘बाहेर येवू दिलेला नाही असे स्पष्ट दिसलेले आहे. त्यामुळे या कारणास्तव पालिकेतील विरोधीपक्षनेता बदलला जाईल असे दिसत नाही . जर कालावधी हेच कारण असेल त्याच कारणाने तर नेता बदलला जाईल पण ज्यांना महापौर पद मिळाले आहे.आमदारकी लढण्याची संधी मिळाली आहे .किंवा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे अशांना आता या पदावर संधी  द्यायची काय ? हा प्रश्न विचारला जातो आहे. त्यात महिलेला आता विपक्षनेता करा असा प्रवाह आहे आणि खासदार वंदना  चव्हाण त्यास अनुकूल असल्याचे समजते आहे. या दृष्टीने नंदा नारायण लोणकर ,ज्या कधी महापौर पदाच्या शर्यतीत होत्या त्यांचे नाव आता या पदासाठी आघाडीवर आहे. विशाल तांबे , बाबुराव चांदेरे ,दत्ता धनकवडे अशी नावे देखील चर्चेत आहेत . राजकारणात तेही राष्ट्रवादीच्या राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही . त्यामुळे प्रत्यक्ष घोषणा होईल त्याचवेळेला खरे असे मानणारा  वर्ग आता मोठ्या संख्येने दिसतो आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा हजारो नागरीकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

पुणे-नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने...

कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजून निर्णय नाही:संजय राऊतांची सुप्रीम कोर्टावर नाराजी

मुंबई- शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही...

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन...