अश्विनी कदम यांना पर्वतीतून राष्ट्रवादी ची उमेदवारी शक्य

Date:

पुणे :महापालिकेतील स्थायी समिती च्या माजी अध्यक्षा, आक्रमक पण शिक्षकी पेशाने सुसंस्कृत म्हणून परिचित असलेल्या अश्विनी नितिन कदम यांना राष्ट्र वादी कडून पर्वती मतदार संघातुन उमेदवारी मिळेल अशी शक्यता राजकीय समीक्षकांकडून वर्तविली जाते आहे . येथील महत्वाचे ज्येष्ठ नेते सुभाष जगताप हे नाव इछुकांच्या यादीत नसल्याने कदम यांचे नाव प्रधान्याने घेतले जाते आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली 10 वर्षे  असलेल्या पर्वती मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. परंतू, रविवारी अजित पवार यांनी पुण्यातील चार मतदार संघ राष्ट्रवादी लढनार असे जाहिर केले आणि  पर्वती तील ईल्च्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तिकीट वाटपात ‘ महिला ‘ चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

पर्वती मतदार संघामध्ये १९७८ पासून आजवर जनता पार्टीचा एक, काँग्रेसचे तीन आणि भाजपाचे तीन आमदार झाले आहेत. यामध्ये शरद रणपिसे आणि माधुरी मिसाळ यांना सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मतदारांनी दिली. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदार संघामध्ये भाजपा आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचा परंपरागत मतदार आहे. गेली दहा वर्षे हा मतदार संघ भाजपाकडे आहे. मोदी लाटेमध्ये २०१४ साली मोठ्या फरकाने भाजपाने पर्वतीचा हा गड राखला होता. त्याला प्रत्त्यूत्तर देण्यासाठी काँग्रेसचे आबा बागूल, राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम तयारी करीत होत्या.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसकडून बागूल आणि राष्ट्रवादीकडून कदम यांनी पक्षाकडे आपण लढण्यास इच्छूक असल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी मतदार संघ लढविनार रविवारी पक्षाच्या मेळाव्यात अजित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केल्यावर पर्वतीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूश झाले आहेत. पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या पाचवर गेली आहे. यामध्ये नगरसेविका अश्विनी कदम, त्यांचे पती आणि मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, शशिकांत तापकीर, संतोष नांगरे आणि अर्चना हनमघर यांचा समावेश आहे. यामध्ये दोन ओबीसी चेहरे आहेत. पुणे जिल्ह्यामधून राष्ट्रवादीकडे केवळ पर्वती मतदार संघात महिलांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकतरी महिला उमेदवार देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी २०१४ साली राष्ट्रवादीकडून पर्वतीमधून निवडणूक लढविली होती. दोन वर्षांपुर्वी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपण पर्वती विधानसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जगताप सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदार संघामधून लढतील असे सांगितले जाते.त्यामुळे अन्य इच्छूकांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दौंडला राज्यस्तरीय ५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी होणार !

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची...

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा: नसीम खान.

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रहाला माजी मंत्री आरिफ नसीम...

शांती क्लिनिकतर्फे परवडणाऱ्या सर्वसमावेशक उपचारासह मोतीबिंदू शिबिराची घोषणा

 पुणे:पुणे येथील शांती क्लिनिक १५ एप्रिल ते ३० एप्रिल...