Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दाऊदचा हस्तक रियाज भाटी …

Date:

14656345_770547579749741_5510311088887687946_n 14725704_770547559749743_5137884475751193475_n

मुंबई- भाजपतर्फे वारंवार दाऊदला देशात आणण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र दाऊदचा हस्तक असलेला रियाज भाटी नामक गुंड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटोमध्ये दिसून आला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.भाजप राजकीय स्वार्थासाठी  गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे उपस्थित होते.

ते म्हणाले,’ रियाज भाटीवर छळवणूक, जमीन बळकावणे, हप्ता वसूली करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच खंडाळा येथील गोळीबार प्रकरणातही त्याचा हात असल्याचे आढळले आहे. २९ ऑक्टोबर २०१५ रोजी आयबीने रेडकॉर्नर नोटीस दिल्यानंतर भाटीला अटक झाली होती. दाऊदच्या पार्टीला फुलजी भाटी या नावाच्या पासपोर्टवर रियाज जाणार असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, असेही मलिक यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांना भेटण्याआधी भेटणारी व्यक्ती कोण आहे याची माहिती आयबीद्वारे काढली जाते. मग रियाज भाटी याची माहिती काढली नव्हती का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासारखे अधिकारी असूनही पंतप्रधानांना भेटताना रियाजची माहिती का काढली गेली नाही, याबाबत मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाटीच्या नावावर दोन पासपोर्ट आहेत. मग दोन पासपोर्ट बाळगल्याच्या गुन्ह्यात १५ दिवसांतच भाटीला जामीन कसा मिळतो? दोन डझन गंभीर गुन्हे असूनही भाटीवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही? भाजपमधून त्याची हकालपट्टी का झाली नाही? असे प्रश्न मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत शेलार यांना एमसीए निवडणुकीत मते मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या मुख्याध्यापकांना धमकावण्याचे काम भाटीने केले होते, असा आरोप मलिक यांनी यावेळी केला. इतके गंभीर गुन्हे असूनही रियाज भाटी भाजपच्या मुंबई कार्यकारणीमध्ये कसा आहे तसेच त्याच्याबरोबरच्या भेटीबद्दलचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी मलिक यांनी केली.

भाजपने राज्यातील सर्व गुंड आपल्या पक्षात सामावून घेण्याचा कार्यक्रम चालवला असल्याची टीका मलिक यांनी केली. १४ वर्ष तुरुंगात असलेल्या शिवा पाटीलला भाजपने माथाडी कामगारांचा नेता केला आहे. मुंबईमध्ये छोटा राजनच्या पत्नीचा भाऊ शेवाळे याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. जळगावचे जुने मनसेचे नेते ललित कोल्हे तडीपारीचे गुन्हेगार आहेत, त्यांनाही भाजपने त्याला पक्षात स्थान दिले आहे. नाशिकमध्ये पवन पवार आणि नागपूरमध्ये मुन्ना यादव सारखे गुन्हेगार भाजपात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे अशा गुंडांच्या आधारे येत्या निवडणुका भाजप लढवणार असेल तर राज्याची जनता भाजपला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मलिक यांनी यावेळी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...