राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत-भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

Date:

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी सरकारकडून पुणे शहराबाबत दुजाभाव

पुणे, ता. २८ – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शहरात रूग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर उपलब्ध होत नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. आमच्यावर केवळ वायफळ टीका करण्यापेक्षा त्यांनी घराबाहेर पडून नागरिकांना मदत केेली पाहिजे. असे सडेतोड प्रत्युतर देत ;पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करीत आहे. त्यामुळेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन आणि कोविडच्या लसींचा शहराला अपुरा पुरवठा होत आहे. ससून रूग्णालयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार कोणतेही काम करीत नाही. अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

कोरोनाची सद्यस्थिती आणि आगामी काळातील नियोजनाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज  नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, सुशील मेंगडे यावेळी उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘१ मे पासून शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत. पुरेशा लसींचा साठा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. नागरीकांमध्ये नोंदणी, जनजागृती आणि लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून भाजपचे कार्यकर्ते मदत करण्यास तयार आहेत.’

खासदार बापट म्हणाले,‘शहराच्या विविध भागांंमध्ये महापालिकेने १८४ लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. परंतु लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच लस केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना लसीच्या साठ्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना दुसरा डोस सहज मिळावा यासाठी योजना करणे आवश्यक आहे.’


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...