पुणे :
‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ पुणे शहरच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 22 जुलै ते 25 जुलै 2016 दरम्यान पुणे शहरातील 57 शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस (पुणे शहर) चे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी पत्रकाद्वारे दिली.
दिनांक 22 जुलैपासून कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, शाळा क्र.134 येथे सकाळी 11 वाजता या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. वह्या, चित्रकलेचे साहित्य, कंपास पेट्या, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक यांची चरित्रपर पुस्तके, पॅड, छत्री विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा शालेय साहित्याचे वाटप या उपक्रमादरम्यान करण्यात येणार आहे.

