.आता मुलांनाही सायकली द्या …. पवारांची सूचना

Date:

पुणे-‘आतापर्यंत शंभर टक्के म्हणजे 25 हजार शालेय मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. हा उपक्रम महत्त्वाचा आहे. मात्र, माझी एक सूचना आहे, वर्षापासून मुलींसोबत आता गरीब मुलांनाही सायकल द्यावी,’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयोजकांना केली.
टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच मेंटर्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली आणि खडकवासला मतदार संघातील शालेय विद्यार्थिनी आणि आशा वर्कर्स यांना शरद पवार यांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे, टाटा ट्रस्टचे भूर्जीस तारापूरवाला, नीरज चंद्रा, आशिष देशपांडे, संयोजक नगरसेवक प्रकाश कदम,सुभाष जगताप ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , नगरसेवक विशाल तांबे आदी उपस्थित होते. या वेळी सहा हजार सायकलींचे वाटप करण्यात आले.

‘एका वर्षापूर्वी हजारो सायकलींचे वाटप केले. त्याचा आम्ही अभ्यास केला. सायकल मिळाल्याने मुलींची शाळेतील उपस्थिती वाढली. शिक्षणाची गुणवत्ताही वाढली. नापासाचे प्रमाण घटले. हा सुप्रिया सुळे यांचा उपक्रम महत्त्वाचा वाटतो. परंतु, आतापर्यंत मुलींनाच सायकली देण्यात आल्या. आपण एका मुलीचे बाप आहोत. त्यामुळे मुलींना सायकल दिल्याचे समाधान आहे. पण मुलांना सायकल द्यायची नाही या धोरणात आता बदल केला पाहिजे. पुढील वर्षापासून गरीब मुलांना देखील सायकल दिल्या पाहिजे. त्यामुळे मुले-मुली शाळेत जातील,’ अशी सूचना शरद पवार यांनी केली. या वेळी ‘खूप शिका. मोठे व्हा. यशस्वी व्हा,’ असा मोलाचा सल्लाही पवार मुलींना द्यायला विसरले नाहीत. नगरसेवक प्रकाश कदम यांनी प्रास्ताविक केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...