मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून निषेध आंदोलन
पुणे :
‘मोदी सरकारला केंद्रात २ वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसाला दिलासा देण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने खासदार आणि शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी अलका टॉकीज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आणि विविध घोषणांनी चौक दणाणून सोडण्यात आला .
‘एकही भूल ,कमल का फूल ‘ ,’फेक इन इंडिया ‘,या सरकारचं करायचं काय ? खाली मुंडी वर पाय ‘ ‘एप्रिल फूल ,वादे गूल ‘,’हेच का अच्छे दिन ‘ अशा अनेक घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते .
माजी महापौर मोहनसिंह राजपाल ,माजी आमदार कमल ढोले -पाटील ,स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके ,नगरसेवक रवींद्र माळवदकर ,प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील ,शहर महिला आघाडी अध्यक्ष रुपाली चाकणकर ,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषी परदेशी ,युवक आघाडी अध्यक्ष राकेश कामठे ,नगरसेवक अप्पा रेणुसे ,महेंद्र पठारे ,माजी नगरसेवक काका चव्हाण ,मंगेश गोळे ,अल्पसंख्य आघाडी अध्यक्ष इक्बाल शेख ,डॉ दत्ता गायकवाड ,भोलासिंह अरोरा ,राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस संघटक मनाली भिलारे ,डॉ सुनिता मोरे , किरण बारटक्के इत्यादी उपस्थित होते