पुणे-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी केली.
सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई भाजप शिष्टमंडळाने आज राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारी अधिकऱ्यांना धमकी दिल्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन दिले असल्याचे मंगल जी यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार मधील मंत्री कायद्याचे उल्लंघन करत आहे. सरकारी अधिकाऱ्यांना धमकावलं जात असून ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे. नवाब मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या असतील तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. या घटना त्वरित थांबल्या नाहीत तर या संदर्भात आम्ही राष्ट्रपती, केंद्रीय गुहमंत्री यांची भेट घेऊ आणि वेळ पडलीच तर आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशारा मंगल जी यांनी दिला.
त्यावेळी अमरजित मिश्रा, उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर उपस्थित होते.
नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, राज्यपालांकडे मुंबई भाजपाची मागणी
Date:

