पुणे-बॉलीवूड डिवा आणि प्रीमियर बॅडमिंटन लीग – पुणे ७ एसेस टीमच्या मालकीण,तापसी पन्नू यांनी त्यांच्या सर्व टीम खेळाडूंसह लँडमार्क निसान खराडी शोरूमला भेट दिली. तापसी, या पहिल्या अश्या सेलिब्रिटी आहेत ज्या प्रीमियर बॅडमिंटन लीग टीमच्या मालकीण आहे. त्यांना बॅडमिंटन आवडत असून त्यांच्या भेटीदरम्यान, लँडमार्क ब्रँडसाठी त्यांच्या प्रेमाचीही घोषणा केली. ग्रुप लॅन्डमार्कसाठी देखील हि भावना परस्पर आहे कारण त्यांना देखील प्रीमियर बँडमिंटन लीग टीम-७ एसेस सोबत सहयोगी होऊन अभिमान आहे.
लँडमार्क निसानसाठी हा आनंदायी क्षण होता. बॉलीवूड स्टार तापसी पन्नू सोबत न्यू निसान किक्सची बुकिंग केल्या गेलेल्या ग्राहकांपैकी एका ग्राहकाने हा क्षण आनंदी असल्याचे व्यक्त केले. अलीकडेच अनावरण करण्यात आलेली निसान किक्स प्रगतीशील एसयूव्ही डिझाइन असून प्रगत तंत्रज्ञानासह सज्ज आहे. तरुण व शहरी साहसी ग्राहकांना आवाहन करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. हे उल्लेखनीय आहे की नवीन निसान किक्स आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ ची देखील ‘ऑफिशियल कार’ आहे.
लँडमार्क ग्रुप भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात व्यावसायिकपणे चालणारी ऑटोमोबाईल डीलरशिप श्रृंखला आहे जी २७ शहरांमध्ये ८० पेक्षा अधिक अत्याधुनिक सुविधा चालवते. भारतातील सर्वात मोठ्या बाजारपेठेंपैकी एक असून पुण्यातील निसानसाठी लँडमार्क हे एकमेव भागीदार आहे. यासोबत वाकडेवाडी, खराडी आणि बारामती येथे आर्ट डीलरशिपची कार्यशाळा सुरु करण्यात आली आहे तसेच वाघोली येथील कार्यशाळा लवकरच सुरू होणार आहे.