पुणे– पैठणीचा घोळ ग … हिरव्या साडीला पिवळी किनार, आज मंगळवार देवीचा वार गं …..या महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा मातेच्या आळवणीने पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी करत आज मंगळवारी दुपारी सारसबागेसमोरील महालक्ष्मीच्या मंदिराचा परिसर मंगलमय करून टाकला. मुलींचा उत्साह पाहून अभिनेत्रींनाही मुलींची शिकवणी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही कन्यापूजन उत्साहात साजरे केले.
महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे नवरात्रोत्सव निमित्त आज मंगळवारी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, संत नामदेव प्राथमिक विद्यालय , सीताराम आबाजी बिब्वे स्कूल , भामरे स्कूल आदी शाळांमधील ३०० मुलींचे कन्यापूजनाचा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस , ज्योत्स्ना म्हाळसे , व अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल , विश्वस्त तृप्ती अगरवाल ,ऍड . प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले , विश्वस्त रमेश पाटोडीया, माजी नगरसेवक शिव मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
आज दुपारी ४. वाजता सरसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन कार्यक्रमास प्रारंभ झाला. आरंभी विविध शाळांमधील मुलींनी जय मातादीचा जयघोष केला. त्यापाठोपाठ पैठणीचा घोळ गं , हिरव्या साडीला पिवळी किनार… आज मंगळवार आज देवीचा मंगळवार. आणि चोरी चोरी माखन खा गये , यशोदा के ललनवा…. हि गीते सादर केली.
त्यांनतर अभिनेत्री शर्वरी जेमनीस यांनी मुलांना उपदेश करणारे गीत ऐलमा पैलमा गणेशदेवा शिकणे … गणपतीच्या हातात मोदक .. तुमच्या हाती पाटी … तुम्ही चांगले शिका … हे गीत त्यांच्याकडून गाऊन घेतले. त्यांनंतर मुलींशी संवाद साधताना जेमनीस म्हणाल्या कि , मुलींनी भरपूर शिकावे. तुम्हाला ज्या गोष्टी शिकताना आनन्द होतो. तीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा.
अभिनेत्री ज्योत्स्ना म्हाळसे यांनी मुलींची शिकवणीच घेतली. त्यांनी या मुलींना तुमची शाळा आवडते का.. शाळेत काय शिकवलं जात. असं विचारत देवीची माहितीही समजावून दिली. यांनतर अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी मुलींना सांगितले कि, मुलींनी खेळण्याबरोरबरच भरपूर वाचन करावे.
या अभिनेत्रींच्या भाषणानंतर कन्यापूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. या तिन्ही अभिनेत्रींनींनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर हळद कुंकू लावले. गजरा त्यांना मळून त्यांची धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं पूजा केली. यांनतर महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे या मुलींना शालोपयोगी साहित्य भेट दिले.