पुणे-जय माता दी, उदे गं अंबे उदे अशा जयघोषात आणि मंगलमय वातावरणात पुणे शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. तर नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची प्राणप्रतिष्ठापना करून शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ केला.
सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात श्री गोविंद गिरीराजजी महाराज (आचार्य किशोर व्यास) यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी संस्कार चॅनेलचे प्रमुख कृष्णकुमारजी पित्ती, मंदिराचे विश्वस्त राजकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी भाविकांनी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.