नवले पुल परिसर जीवघेणा : आज 2 ठार,लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना कधी येणार जाग ..?

Date:

पुणे- कात्रज देहूरोड मार्गावरील नवले पूल आणि परिसरात आजवर मोजता येणार नाही असे असंख्य विचित्र अपघात झाले असून सातत्याने सुरु असलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी काही करावे असे मात्र कोणत्याही पोलीस, महापालिका वा राज्य शासनाच्या अधिकाऱ्याला अगर लोकप्रतिनिधी असलेल्या नगरसेवक, आमदार वा खासदाराला वाटेना ..त्यांना जाग येईना असे चित्र असताना आज पुन्हा अनेक गाड्या एकमेकंवर धडकून जीवघेणा अपघात झाल्याने पुन्हा भय इथले संपेना असे स्पष्ट झाले आहे.

मागील काही दिवसांपासून नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रकने तब्बल आठ वाहनांना उडवीत झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आठजण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पुणे-बंगळुरू बाह्यवळणावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकला लागलेली आग विझविली.प्रशांत गोरे (वय 32, रा. उस्मानाबाद) व राजेंद्र मुरलीधर गाढवे (वय 65, रा. आंबेगाव खुर्द) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अपघातात आठजण जखमी असून त्यापैकी चौघेजण गंभीर जखमी आहेत. प्रेमराज राणाराम बिष्णोई (वय 25, खेडजडगी, जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.बिष्णोई हा त्याच्या ताब्यातील 22 चाकी ट्रकमध्ये (आरजे.19, जीएस 4673) बंगळुरू येथून तब्बल 41 टन इतक्‍या वजनाचे लोखंड भरुन ते गुजरातमधील अहमदाबादला घेऊन जात होता. हा ट्रक रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ आला, तेथून स्वामी नारायण मंदिराजवळ पोचल्यानंतर ट्रकचा ब्रेक निकामी झाला. त्यातच तीव्र उतार लागल्याने ट्रकने समोरुन जात असलेल्या पाच कार, एक रिक्षा व दोन दुचाकींना उडविले. हा अपघात इतका भीषण होता, की त्यामध्ये तीन कार व रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

प्रवाशांना घेऊन जाणारा रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने रिक्षाचे नुकसान झाले. त्यामध्ये रिक्षाचालक राजेंद्र गाढवे यांच्यासह रिक्षातील प्रवासी जखमी झाले. तर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार प्रशांत गोरे हे देखील गंभीर जखमी झाले होते. तर अन्य आठ नागरिक या अपघातात जखमी झाले. सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकच्या डिझेलच्या टाकीने पेट घेतला. त्यानंतर काही अंतरावर पुलावरच ट्रक थांबला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाणे, वाहतूक शाखेचे पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढत उपचारांसाठी रुग्णालयात पाठवून दिले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रशांत गोरे, राजेंद्र गाढवे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...