पुणे- अहमदाबाद येथील ज्येष्ठ चित्रकार नातु मिस्त्री यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. दैनंदीन जीवन, चौकातील दृश्य, जुन्या हवेल्या, प्राचीन वास्तु आणि व्यक्तिचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. सकाळी ११ ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ आहे.
नातु मिस्त्री यांनी स्वतःची चित्रशैली विकसित केली आहे. त्यांनी काढलेल्या चित्रांमध्ये ऍक‘लिक रंगाचा विशेषतः निळ्या आणि तपकिरी रंगाचा एकत्रितपणे वापर केला आहे. रंग माध्यमाची समज आणि चित्रांमध्ये जिवंतपणा निर्माण करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा या प्रदर्शनातून अनुभव घेता येतो. ब‘शचा वापर करून मारलेले विविध रंगांचे फटकारे हे त्यांच्या कलेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विशेषतः पांढर्या रंगांच्या फटकार्यातून रचनांचे वेगळेपण स्पष्टपणे दिसून येते, त्यामुळे प्रकाश आणि हालचालींची विशेष अनुभूती येते.