डी.ई.एस.सेकंडरी शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
पुणे : टिळक रोड येथील डी.ई.एस. सेकंडरी शाळेत २९ ऑगस्ट रोजी ( हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस) राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
क्रीडा दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून डे.ए. सोसायटीच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, पर्यवेक्षिका विजया जोशी, क्रीडा शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते.
श्री रणपिसे यांच्या हस्ते विविध खेळांवर आधारित प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे उद् घाटन लगोरी फोडून करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून स्मृतिचिन्ह, मैदानावरील वापरायची साधने, भारतातील दिले जाणारे खेळातील पुरस्कार, आशियाई स्पर्धा, विविध खेळांची मैदाने व खेळातील दुखापती आदी विषयांवर केलेले प्रकल्प लक्षणीय होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी क्रीडा साहित्याचे पूजन करून विद्यार्थ्यांबरोबर कॅरम खेळण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्रीडा शिक्षिका सुनेत्रा वेदपाठक, सचिन घाडगे, प्रवीण जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून प्रकल्प तयार करून घेतले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका ज्योती बोधे, पर्यवेक्षिका सरिता स्वादी, विजया जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता क्रीडांगणावर, मैदानावर मुलांनी सतत खेळले पाहिजे ज्यायोगे त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होईल हाच विचार डी. ई.एस. प्रायमरी स्कूल नेहमी उचलून धरते. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांना मानवंदना देऊन साजरा केलेल्या क्रीडा क्रीडा दिना दिवशी प्रायमरी स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांच्या हस्ते मैदानाची पूजा केली गेली. यावर्षी चालवण्यात येत असलेल्या विविध खेळांची प्रात्यक्षिके जसे की, तायक्वांदो, रोप-मल्लखांब, मल्लखांब, एरोबिक्स ज्या खेळांपासून विद्यार्थ्यांचा दिवस सुरू होतो त्याचा दृश्राव्य व्हिडिओ शाळेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला तसेच पालक व शिक्षकांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी पर्यवेक्षिका ग्रेसी डिसोजा व सिमरन गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक योगिनी कानडे व श्रीकांत जोशी यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बरोबर घेऊन हा सोहळा उचलून धरला
रमणबाग प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
सोमवार दि. 29 ऑगस्ट 2022 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस-‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा भारती- पश्चिम भाग प्रमुख श्री.कृष्णकुमार राणे व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू प्रा.शैलेश आपटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रत्येक भारतीय अबाल वृद्धानी क्रीडांगणावर किमान एक तास खेळ खेळणे आवश्यक आहे;त्यातून व्यक्ती,समाज व देशाचे आरोग्य सुधारेल असे विचार शैलेश आपटे यांनी मांडले. कृष्णकुमार राणे यांनी नियमित खेळाच्या सरावातून तन व मन तंदुरुस्त राखण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
सलग चार ऑलिम्पिक मध्ये भारताला हॉकी खेळात सुवर्णपदक प्राप्त करून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा आदर्श क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मा.शालाप्रमुख सुनील शिवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.महेश जोशी यांनी अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेलार यांनी केले तर संजय अहिरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक दिलीप रावडे,शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.