‘ हे राम, नथुराम ‘ नाटकाविरुद्ध संघर्ष चालूच राहील -विकास लवांडे
पुणे :
‘ गांधी विचार हाच मानवतावादी, शाश्वत विचार असून ‘ हे राम, नथुराम ‘ नाटक इतिहास विकृत स्वरुपात सादर करीत असल्याने या नाटकाविरुद्धचा संघर्ष चालूच राहील ‘ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.
२८ जानेवारी रोजी पुण्यातील ‘ नथुराम ‘ प्रयोगाला जोरदार विरोध केल्याने विकास लवांडे यांना पोलिसांनी अटक केली होती. व्यक्तिगत बाँड लिहून देणार नाही, सत्याग्रह करणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र , राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी हा संघर्ष पोलिस कोठडीतून लढण्यापेक्षा बाहेर सुरू ठेवावा, असा सल्ला दिल्याने श्री. लवांडे यांनी व्यक्तिगत बाँड दिला.
‘ राष्ट्रपुरुष असलेल्या महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे विकृत रुपांतरण सहन करणार नाही. आणि ‘ नथुराम ‘ नाटकाविरुध्द चळवळ चालूच ठेवणार .’हे राम नथुराम नाटक ‘ त्वरित बंद झालेच पाहिजे.राष्ट्रपुरुषांची बदनामी अवमान करणाऱ्या नाटक निर्माते लेखक कलावंत इत्यादी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करुन आलेल्या नाटकातून राष्ट्रपुरुषावर विकृत शेरेबाजी सहन करणार नाही.सत्याचा आवाज मोठा केला पाहिजे ‘
असे श्री. लवांडे यांनी पत्रकात म्हटले आहे