आपण गुजरातचे पंतप्रधान असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सिध्द केले, नाना पटोलेंची टीका

Date:

रत्नागिरी-गुजरातचेच पंतप्रधान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे, तिजोरीत टॅक्स स्वरूपात जो पैसा जातो, त्यातला 40 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आज राज्यातील जनता अडचणीत आहे, अशा वेळेस केंद्राने भरीव मदत करावी, त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला 2 हजार कोटी तरी मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि ते आमच्या हक्काचे पैसे आहेत भीक नाही अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.ते आज तौकते चक्रीवादळाने झालेल्या नुक़सानीची पहाणी करण्यासाठी रत्नागिरीत आले होते.

यावेळी पटोले म्हणाले की, कधी नव्हे असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही आगळीवेगळी आहे. राज्यपाल पदाची एक वेगळी गणिमा आहे. राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात. राज्यपाल हा राज्यातील सर्व जनतेचा असावा, असं म्हणत नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत जी नावं पाठविण्यात आली आहेत, ती नियमाला धरून पाठवण्यात आली आहेत. जर त्याच्यात काही चुकलं असेल तर राज्यपालांनी कळवलं पाहिजे. त्याच्यात काही क्वेरी असेल तर राज्य सरकार करून देइल, मात्र त्यांची नियुक्ती थांबवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. भाजपने या प्रकारचं कृत्य करू नये, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...