काँग्रेस म्हणजे फाटलेले आभाळ अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली होती. काँग्रेसला लागलेल्या गळतीवरून शिवसेनेने अग्रलेख लिहला होता. यावर बोलताना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमच्याकडे एक म्हण आहे. गिधाडाच्या शापने ढोर मरत नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आमच्या विरोधात कोण काय बोलते यांच्याशी आम्हाला काही नाही. काँग्रेसने देशासाठी अनेक बलिदान दिले आहे. मात्र ज्यांना बलिदान कळतच नाही, ज्यांचा आणि बलिदानाचा काही संबंध नाही अशा लोकांविषयी काय बोलणार असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.ज्यांना विचार नाही, बलिदानाची पार्श्वभूमी नाही अश्या शिवसेनेबाबात काय बोलणार असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर मी सामना वाचत नाही म्हणत शिवसेनेने काँग्रेसला सल्ला देण्याची गरज नाही असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यामुळे मविआत सर्व काही आलबेल आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संघटनामध्ये भाजपला साथ दिली जात आहे. यामुळे कोण कोणाला बळ देत आहे हे सांगण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे. आमचे नगरसेवक फोडत काँग्रेसवर कुरघोडी करण्याचे प्रकार मविआतील मित्र पक्ष करताय यावरही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळात आमच्या मंत्र्यांसोबत दुजाभाव होतो असा आरोपही त्यांनी यावेळी लगावला आहे. केवळ भाजपला सत्ता मिळू नये म्हणून आम्ही या सरकारसोबत आलासे होतो. मात्र आता उलट भाजपला ताकद दिली जात आहे. असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
सोबत रहाणारा दुश्मण नको
आम्हाला देश वाचवायचा आहे, भाजप ज्या प्रकारे देश विकत आहे, कुठेतरी त्यांना थांबवणे गरजेचे आहे. आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात सत्तेमत आलो. आमची भूमिका स्पष्ट आहे. दुश्मन समोर असला तर चालेल मात्र सोबत राहून घात नको, असा इशाराच त्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना दिला आहे.