तीन तलाठी आणि मंडळ अधिकारी दोषी
पुणे-वाखरी (ता.दौंड जि.पुणे) येथे शासनाच्या 5 हेक्टर 76 आर जमिनीवर जाणीवपूर्वक बोगस खातेदाराची नावे लावल्याप्रकारणी तीन तलाठी व तत्कालीन मंडळ अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे , आमदार भिमराव तापकीर यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला
महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथम अधिवेशनात काल दि. 24/03/2022 रोजी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी वाखरी (ता.दौंड, जि.पुणे) येथे शासनाच्या १३ एकरहून अधिकच्या जमिनीवर बनावट खातेदाराची नावे लावून गैरव्यवहार झाला असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, गैरव्यवहाराबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा प्रश्न विचारला होता.

या प्रश्नात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात दिलेल्या लेखी उत्तरामध्ये मौजे वाखारी, ता.दौंड, जि.पुणे येथील गट नं. 220/4 मधील 5 हे. 76 आर क्षेत्रावरील सरकार नाव कमी करून खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याबाबतचा गैरव्यवहार झालेला आहे. हे मान्य करून मौजे वाखारी, ता. दौंड जि. पुणे येथील एकूण 68 गट तपासलेले असून त्यापैकी गट नं. 220/4 मध्ये सरकार नाव कमी करून खरेदी-विक्रीचा गैरव्यवहार करण्यात आलेला होता असे सांगितले या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने तहसिलदार यांच्या स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली होती असे सांगून चौकशीमध्ये तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांनी जाणीवपुर्वक चुक केल्याचे दिसून आल्याने* तत्कालीन 3 तलाठी व तत्कालीन मंडळ अधिकारी दोषी आढळून आल्याने त्यांच्याविरूध्द विभागीय चौकशीचा प्रस्ताव दिनांक 28/02/2022 रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेला आहे असे सांगितले. तसेच, मौजे वाखारी, ता. दौंड जि. पुणे येथील गट नं. 220/4 मधील क्षेत्रावर दिनांक 21/02/2022 च्या आदेशान्वये सरकार नाव दाखल करून इतर हक्कात सिलींग शर्तं शेरा दाखल करण्यात आला आहे असे सांगितले.

