पुणे-शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी किल्ले स्पर्धेतील स्पर्धकांना, इतिहास अभ्यासकांबरोबर मोफत किल्ले अभ्यास सहल व किल्ल्यावरच बक्षीस समारंभ असा उपक्रम आयोजित केला जातो . यंदा किल्ले रोहिडा येथे या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, इतिहास संशोधक व शस्त्र संग्राहक प्रमोद बोराडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .यावेळी मार्गदर्शन करताना श्री.बोराडे म्हटले की गड किल्ल्यांमुळेच छत्रपती शिवरायांनी पातशाह्या लोळवल्या, परकीय आक्रमणे परतवून लावली, व गुलामगिरी रुपी अंधारातून स्वराज्यरूपी प्रकाश या महाराष्ट्रात पसरवला .यावेळी, प्रतिष्ठान च्या अध्यक्षा, नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे यांनी, प्लास्टिक न वापरण्याची शपथ उपस्थितांना दिली .प्रतिष्ठान तर्फे रोहिडा गडावर, स्वछता मोहीम राबविण्यात आली व प्लास्टिक व कचरा गोळा करून गड स्वच्छ करण्यात आला . रा.स्व.संघ पुणे महानगर प्रचारक अण्णा वाळिंबे व सिंहगड भाग कार्यवाह .सचिन भोसले यांनी नारळ फोडून सहलीची सुरुवात केली .कार्यक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष होते व एकूण 484 जणांनी उपक्रमात सहभाग घेतला .
दुर्ग जागरातूनच राष्ट्र जागरण होईल- शिवकालीन शस्त्र संग्राहक प्रमोद बोराडे
Date:

