सरकारी वकीलाने न्यायालयाच्या आवारातच केली न्यायाधीशाला मारहाण….

Date:

नागपूर- उपराजधानी नागपुरातील जिल्हा न्यायालयापुढे वकीलांमधील खूनी संघर्षाचे प्रकरण ताजेच असताना न्यायालयाच्या व्हरांड्यातच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. देशपांडे यांना सरकारी वकीलाने मारहाण केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांनी वकीलास ताब्यात घेऊन अटक केली. व्यक्तीगत दिवाणी प्रकरणात आपल्या विरोधात निवाडा दिल्याच्या कारणावरून वकीलाने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे.

दुपारी बारा वाजताच्या सुमारास न्यायमंदिरच्या सातव्या माळ्यावर ही घटना घडली.दिवाणी न्यायाधीश किरण रंगराव देशपांडे हे काही प्रशासकीय कामासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. पी. इंगळे यांच्या कक्षात आले होते. कक्षातून बाहेर पडल्यावर ते त्यांचे सहकारी न्या. एस.व्ही. देशमुख यांच्यासह न्यायालयातील लिफ्टजवळ प्रतीक्षेत उभे होते. त्याचवेळी अतिरिक्त सरकारी वकील अॅड दिपेश मदनलाल पराते (वय ४२) तेथे आला. त्याने संतापाच्या भरात न्या. देशपांडे यांना ठार मारण्याची धमकी देत थापड मारली. त्यामुळे न्या. देशपांडे यांचा चष्मा खाली पडला. त्यांना भोवळ आली. न्या. देशपांडे यांना पुन्हा धमकी देत अॅड. पराते तेथून सहा माळ्याच्या दिशेने पळाला. न्या. देशपांडे यांनी आरडाओरड केल्यावर तेथील पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी अड. पराते याच्या दिशेने धाव घेऊन त्याला पकडले. त्याला सुरुवातीला न्या. व्ही. बी. कुळकर्णी यांच्या लघुलेखकाच्या कक्षात आणले गेले. तर या घटनेत किरकोळ जखमी झालेले न्या. देशपांडे यांना न्या. कुळकर्णी यांच्या कक्षात बसविण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी न्यायालयाच्या व्हरांड्यात पक्षकार आणि वकीलांची वर्दळ होती. घटनेची माहिती न्यायालय परिसरात पसरताच वकील व न्यायालयात आलेल्या लोकांनी सहाव्या माळ्यावर एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती सदर पोलिस ठाण्याला देण्यात आल्यावर पोलिसांनी अॅड. दिपेश पराते याला ताब्यात घेतले.

न्या. देशपांडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, अॅड. दिपेश पराते याला पोलिस पुन्हा न्यायालयात हजर करीत असताना त्याने आपल्याला या प्रकरणात फसविण्यात आल्याचा कांगावा केला. आपण कोणालाही मारहाण केली नाही, असा दावा करतानाही तो दिसला. दरम्यान, सदर पोलिसांनी अॅड. परातेविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२ आणि ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

निकाल विरोधात गेल्यामुळे मारहाण
पोलिस सूत्रांनी सांगितले की, अॅड. दिपेश पराते यांचे वडील अॅड. मदनलाल पराते यांनी न्या. देशपांडे यांच्या न्यायालयात पार्टीशन सुट दाखल केली होती. २८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने सदर प्रकरण कालमर्यादित केले. त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून न्या. देशपांडे यांनी प्रकरण निकाली काढले. निकाल विरोधात गेल्यामुळे संतापातून अॅड. पराते याने आपल्यावर हल्ला केला, असे न्या देशपांडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खरातला भेटल्याच्या बातम्या खोट्या – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे- नाशिक येथील 'एक्सप्रेस इन' हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या...

अपोलो हॉस्पिटल्सच्या एअर ॲम्ब्युलन्स सेवेचे आधुनिकीकरण

अधिक सक्षम सेवेमुळे देश-विदेशातील रुग्णांना मिळणार वेगवान उपचार ~ अनेक एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेटरसोबत सामंजस्य करार: रुग्णांची ने-आण अधिक सुलभ करण्यासाठी, उत्तम समन्वय राखण्यासाठी आणि हस्तांतरणाचा खर्च कमी करण्यासाठी विविध एअर ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादारांशी करार करण्यात आले आहेत. ~ १०६६ EMS - एकच संपर्क केंद्र: सहयोगी कंपन्यांच्या मदतीने पुरवल्या जाणाऱ्या सर्व एअर ॲम्ब्युलन्स सेवांसाठी '१०६६ EMS' हे एकमेव समन्वयाचे केंद्र (Single Access Point) म्हणून काम करेल पुणे-: अपोलो हॉस्पिटल्सने 'रुग्ण वाहतूक सुविधेबाबत' एक विशेष उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध भागीदारांसोबत समन्वय साधून हवाई वैद्यकीय वाहतुकीद्वारे गंभीर स्थितीतील रुग्णांना प्रगत आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही महिन्यांत, अपोलो हॉस्पिटल्सने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एअर ॲम्ब्युलन्स कंपन्यांसोबत करार केले आहेत. यामुळे तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आता अधिक सोपे आणि सुरक्षित होईल. ही सर्व सेवा अपोलोच्या '१०६६ इमर्जन्सी रिस्पॉन्स नेटवर्क' द्वारे चालवली जाईल. या अंतर्गत सर्व सेवा पुरवठादारांना एकत्र आणून रुग्णांची वाहतूक वेगाने आणि सुव्यवस्थित पद्धतीने करणे शक्य होईल. अपोलो हॉस्पिटल्सच्या या नवीन भागीदारीमुळे आपत्कालीन वैद्यकीय प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. दुर्गम किंवा लांबच्या ठिकाणाहून रुग्णांना आणताना होणारा विलंब, जास्त खर्च आणि मध्यस्थांची गरज आता कमी होईल. या नव्या उपक्रमामुळे रुग्णांची हवाई वाहतूक सेवा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे. एअर ॲम्ब्युलन्स सेवा आता अधिक प्रगत आणि अधिक विस्तृत केल्याबाबत, अपोलो हॉस्पिटल्सच्या उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी म्हणाल्या: "गंभीर परिस्थितीतील रुग्णाला, योग्य वेळी योग्य रुग्णालयात पोहोचवणे हे जीव वाचवण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरते. नामवंत एअर ॲम्ब्युलन्स पुरवठादारांशी केलेल्या हातमिळवणीमुळे, आता रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना प्रगत उपचार मिळवणे अधिक सोपे झाले आहे. ही सेवा केवळ शहरांपुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित पद्धतीने उपलब्ध असेल. आमच्या '१०६६' रिस्पॉन्स नेटवर्कच्या मदतीने रुग्णांना उपचारांचे उत्तम नियोजन आणि रुग्णालयाची पूर्वतयारी अशा दोन्ही सुविधा मिळतील. यामुळे रुग्णांना हव्या त्या वेळी आवश्यक उपचार मिळण्यासाठी एक सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग तयार झाला आहे." पहिल्या टप्प्यात, अपोलो हॉस्पिटल्सने देश-विदेशातील रुग्णांच्या वाहतुकीसाठी अनेक एअर ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादारांशी करार केले आहेत. यामध्ये ब्ल्युडॉट चार्टर्स अँड एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस (युएई), एरोमेड इंटरनॅशनल रेस्क्यू सर्व्हिसेस प्रा. लि., झंकार एव्हिएशन प्रा. लि., iCATT हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि., एअर रेस्क्युअर्स वर्ल्ड वाइड प्रा. लि., वेदांत एअर रेस्क्यू प्रा. लि., एरोकेअर एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, आयुसेवा एअर अँड ट्रेन ॲम्ब्युलन्स, एअर मेडिकल 24X7 प्रा. लि. आणि फ्लॅप्स एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. गंभीर स्थितीतील रुग्णाला तातडीने प्रगत उपचार केंद्रांमध्ये हलवणे आवश्यक असते, अशा वेळी सहयोगी कंपन्यांसोबत समन्वय साधून हवाई रुग्णवाहिका सेवा सहज उपलब्ध करून देणे, हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या इमर्जन्सी विभागाचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. धवपलानी अलागप्पन म्हणाले: "एअर ॲम्ब्युलन्समध्ये लाइफ-सपोर्ट सिस्टम, व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर आणि इतर प्रगत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असतात. यामुळे अतिशय गंभीर रुग्णांना प्रवासादरम्यानही 'आयसीयू' सारख्याच सखोल देखभालीचा आधार मिळतो. संपूर्ण प्रवासात, प्रशिक्षित वैद्यकीय पथक आणि प्रमाणित डॉक्टरांद्वारे रुग्णांचे सतत निरीक्षण केले जाते. हे डॉक्टर रुग्णांना औषधे देऊ शकतात आणि त्यांना स्थिर ठेवण्यासाठी, आराम मिळवून देण्यासाठी आवश्यक ते उपचारही करू शकतात. क्रिटिकल केअर युनिटमध्ये मिळणारे वैद्यकीय उपचार प्रवासादरम्यानही कायम मिळत राहणे अत्यंत आवश्यक असते आणि ते मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत." अपोलो हॉस्पिटल्सच्या हेल्थकेअर लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामकृष्ण विजय वर्मा म्हणाले: "अपोलोच्या '१०६६' या आपत्कालीन हेल्पलाइनवर विनंती आली की, तातडीने आमचे इमर्जन्सी रिस्पॉन्स पथक रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेते. त्यानंतर प्रवासासाठी सर्वात योग्य मार्ग निश्चित केला जातो आणि आमच्या सहयोगी एअर ऑपरेटरच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन केले जाते. विमान वाहतुकीशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींचे (लॉजिस्टिक्स) व्यवस्थापन एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेटरद्वारे केले जाते. या सेवेचा दर आधीच निश्चित असल्याने आणि यामध्ये मध्यस्थांना कोणताही वाव नसल्यामुळे, अलीकडे या सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची मोठी आर्थिक बचत झाली आहे." हा उपक्रम अपोलोच्या सध्याच्या आपत्कालीन पायाभूत सुविधांना देशभरातील '१०६६' नेटवर्कशी जोडतो. यामध्ये अपोलोची आपत्कालीन समन्वय क्षमता, जमिनीवरील रुग्णवाहिका सेवा, विमानतळ ते रुग्णालय कनेक्टिव्हिटी आणि भागीदारांमार्फत चालवली जाणारी हवाई वाहतूक यांचा समावेश आहे. यामुळे रुग्णांना एका बेडवरून दुसऱ्या बेडपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण सहकार्य मिळेल आणि प्रतिसादाची कार्यक्षमता सुधारेल. परिणामी, दुर्गम भाग, टियर-२ आणि टियर-३ शहरे तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रगत उपचार मिळणे शक्य होईल. हा उपक्रम सुरु करून, अपोलो हॉस्पिटल्स आपली आपत्कालीन रुग्ण वाहतूक सेवा आणि रुग्णांना मिळणारे उपचार अधिक सुलभ करण्यावर अधिक भर देत आहे. प्रगत उपचारांसाठी वेळेला खूप जास्त महत्त्व असते. त्यामुळे शहरांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय वाहतुकीसाठी अपोलोने एक अधिक संघटित, सुव्यवस्थित, सक्षम चौकट तयार केली आहे.

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 30 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण...