कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्या सोडविणेसाठी विशेष बैठक – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Date:

सिटू व कंत्राटी महासंघाचा नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा

नागपूर. ( विशेष प्रतिनिधी ) –  राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या न्याय मागण्या सोडविणेसाठी विशेष बैठक घेणेचे सुचना मुख्य सचिवांना देण्यात येत असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शिष्टमंडळ मंडळास भेटी दरम्यान दिले. राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या विधानभवनातील मोर्चा नंतर शिष्टमंडळ विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भेटून निवेदन देणेत आले. या प्रसंगी ते बोलत होते.

 मुख्यमंत्री यांचे कडून खुप अपेक्षा – कार्याध्यक्ष सचिन जाधव
राज्यांत कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्या ऐवजी बाह्यस्त्रोत एजन्सी नेमण्याचे विचार अनेक विभागात सुरू आहे. यामुळे कर्मचारी यांचे मनांत शासनाबाबत भितीचे वातावरण आहे. समान काम समान वेत द्या. नोकरीत सुरक्षा द्या. अशा विविध मागण्या बाबत विधीमंडळावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडून आम्हाला अपेक्षा असून या प्रश्नाबाबत लक्ष घालतील असे महासंघांचे कार्याध्यक्ष व स्वच्छता विभाग कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

 समान काम समान वेतन द्या  – मुकुंद जाधवर
राज्यांत अनेक कर्मचारी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समान काम, समान वेतन नाही. सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी करा. कर्मचारी यांना सुरक्षा द्या. ग्रामसेवक यांचे धर्तीवर 03 वर्षे सेवा पुर्ण करणारे यांना शासनात कायम करा असे आवाहन महासंघांचे राज्याचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी केले.

 बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम समायोजन करा  – शाहरुख मुलाणी
मंत्रालय ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्व विभागांत काम करत असलेल्या त्यात मंत्रालय, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश असलेल्या सर्व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम समायोजन करावे तसेच राज्यांत अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. शासन एजन्सी निश्चित करून कर्मचारी नेमण्यात येत आहेत. या कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे. राज्यातील विविध विभागांत रिक्त पदे आहेत. त्या समकक्ष पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी. या मागणीबाबत ठोस निर्णय शासनाने घ्यावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा’, अशी मागणी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी केली.

राज्यातील शासकीय कंत्राटी कर्मचारी यांचा न्याय मागण्यासाठी नागपूर येथे नुकतेच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या दिवशी मोर्चा काढण्यात आला होता. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष मुकुंद जाधवर, कार्याध्यक्ष सचिन जाधव , बाळासाहेब कोकाटे, यांनी भेटून विधान सभेचे अध्यक्ष नाना  पटोले यांना भेटून मागण्याचे सविस्तर निवेदन दिले. या प्रसंगी मोर्चात महासंघांचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, भुजल सर्व्हेक्षण विभागाचे शहाजी नलावडे, पाणी गुणवत्ता विभागाचे सतीश मुंढे, नागपूर येथील कंत्राटी महासंघांचे चे विदर्भ प्रमुख प्रशांत पवार, सिटूचे देशपांडे, कमलेश गजभिये, संतोष बनसोड, प्रमोद ठाकरे, निखील रौदाळकर, नरेंद्र हिरवंडे, कुशल हुरकन, नरेद्र देशकर, विशाल श्रीखंडे, सिटू च्या राजश्री घुले, ललिता मादळे, पाणी गुणवत्ता विभागाच्या रेश्मा भोईर, आदींसह हजारो च्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. नागपूर येथील चाचा उद्यान येथून या मोर्चास सुरूवात झाली. तेथून विधानमंडळा पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.  या शिवाय उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार सुद्धा उपस्थित होते. असिफ खान, पंकज वंजारी, नरेंद्र हॅलोंडे यांच्या सह हजारो कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष मुकुंद जाधवर, कार्याध्यक्ष सचिन जाधव , पाणलोट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कोकाटे यांनी संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...