कोल्हापूर -: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या एन हर्षिनी, महाराष्ट्राच्या अस्मि आडकर, यांनी तर, मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस, कर्नाटकाच्या क्रिश त्यागी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या बिगरमानांकीत एन हर्षिनी हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा टायब्रेकमध्ये 7-6(5) ,3-6,6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुण्याच्या दहाव्या मानांकित अस्मि आडकरने नवव्या मानांकित महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेचा 4-6,6-1,6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात तामिळनाडूच्या आठव्या मानांकित प्रणव रेथिन आरएस याने हरियाणाच्या चौथ्या मानांकित तेजस आहुजाचे आव्हान 6-1,6-2 असे सहज संपुष्टात आणले. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत आपलाच राज्य सहकारी तेराव्या मानांकित तनुष घिडयालचा 6-1,6-0 असा पराभव केला.
निकाल: उपांत्य फेरी: मुली
एन हर्षिनी(कर्नाटक)वि.वि.ऐश्वर्या जाधव(महा)(2) 7-6(5) ,3-6,6-3
अस्मि आडकर(महा)(10)वि.वि. आकृती सोनकुसरे(महा)(9) 4-6,6-1,6-0
मुले:
क्रिश त्यागी(कर्नाटक)(1)वि.वि. तनुष घिडयाल(कर्नाटक)(13)6-1,6-0
प्रणव रेथिन आरएस(तामिळनाडू)(8)वि.वि.तेजस आहुजा(हरयाणा)(4) 6-1,6-2

