कोल्हापूर, 2 जून 2022 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या एन हर्षिनी, महाराष्ट्राच्या अस्मि आडकर, ऐश्वर्या जाधव यांनी तर, मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस, कर्नाटकाच्या तनुष घिडयाल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या बिगरमानांकीत एन हर्षिनी हिने चौदाव्या मानांकित तामिळनाडूच्या हरिताश्री वेंकटेशचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(0), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. पुण्याच्या दहाव्या मानांकित अस्मि आडकरने अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या तामिळनाडूच्या माया राजेश्वरनचा 7-6(5), 6-4 असा तर, दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने आंध्रप्रदेशच्या सहाव्या मानांकित मनोज्ञ मदासूचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. नवव्या मानांकित महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेने श्री तन्वी दसरीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलांच्या गटात तामिळनाडूच्या आठव्या मानांकित प्रणव रेथिन आरएस याने ओडिशाच्या दुसऱ्या मानांकित देबासिस साहूचा 6-3, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या वेंकट बटलांकीला 6-2, 6-2 असे पराभूत केले.
निकाल: उपांत्यपुर्व फेरी: मुली
ऐश्वर्या जाधव(महा)(2)वि.वि.मनोज्ञ मदासू(आंध्रप्रदेश)(6) 6-2, 6-1;
आकृती सोनकुसरे(महा)(9)वि.वि.श्री तन्वी दसरी 6-3, 6-2;
अस्मि आडकर(महा)(10)वि.वि. माया राजेश्वरन(तामिळनाडू)7-6(5), 6-4;
एन हर्षिनी(कर्नाटक)वि.वि.हरिताश्री वेंकटेश (तामिळनाडू)(14)3-6, 7-6(0), 6-0;
मुले:
क्रिश त्यागी(कर्नाटक)(1)वि.वि.वेंकट बटलांकी(तेलंगणा)6-2, 6-2;
तनुष घिडयाल(कर्नाटक)(13)वि.वि. आराध्य क्षितिज(कर्नाटक)6-2, 4-6, 6-3;
तेजस आहुजा(हरयाणा)(4)वि.वि.अर्जुन राठी(हरयाणा)(6) 6-3, 6-3;
प्रणव रेथिन आरएस(तामिळनाडू)(8)वि.वि.देबासिस साहू(ओडिशा)(2) 6-3, 6-1;
दुहेरी: मुले: उपांत्य फेरी:
तेजस आहुजा/क्रिश त्यागी[1] वि.वि.अर्जुन पंडित/जैसन डेव्हिड[3]6-2, 6-1;
प्रणव रेथीन आरएस/महालिंगम खांडवेल वि.वि.वेंकट बटलांकी/देबसिस साहो 6-4, 7-6(5);
मुली: उपांत्यपूर्व फेरी:
सेजल भुतडा/माया राजेश्वरन वि.वि.हर्षिनी विश्वनाध/मनोज्ञ मदासु [1] 6-3, 3-6, 10-6;
ऐश्वर्या जाधव/आकृती सोनकुसरे[3] वि.वि.अस्मि आडकर/अवनी चितळे 6-3, 6-2;
नैनिका बेन्द्रम/शगुन कुमारी[4]वि.वि.अपरा खांडरे/प्रिन्सी मांडागला 6-1, 6-2;सायली ठक्कर/श्रीनिधी बालाजी[2] वि.वि.आरुषी रावळ/इशिता मिधा 6-1, 6-2.

