पुणे – १२३ एकर अँमिनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याच्या भाजपच्या विषयाला अगोदर विरोध नंतर काल मान्यता देण्याचा निर्धार जाहीर केलेल्या राष्ट्रवादीने आज पुन्हा या विषयाला विरोध करण्याची मूळ भूमिकेवर असल्याचे स्पष्ट केले आहे . या अँमिनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याच्या विषयाला काल पाठींबा देणाऱ्या खासदार वंदना चव्हाण यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत आम्ही या विषयाला विरोध करत आहोत आणि जर भाजपने बहुमताच्या जोरावर हा विषय आज मुख्य सभेत मंजूर करवून घेतला तर आम्ही राज्य सरकारला यात हस्तक्षेप करायला लावू असे स्पष्ट केले आहे . तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हि आपण मूळ भूमिकेवर म्हणजे अँमिनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याच्या भाजपच्या विषयाला विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे .
दरम्यान काल खासदार वंदना चव्हाण आणि अंकुश काकडे या दोन सिनिअर नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विषयाला पाठींबा जाहीर केला होता , त्यावर कॉंग्रेस मध्ये राष्ट्रवादीच्या या घुमजाव चे मोठे पडसाद उमटले ज्याकडे ‘माय मराठी ‘ने सर्व प्रथम लक्ष वेधले . आणि या विषयाला खुद्द कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील ‘पुण्यासह यांनी देश विकायला काढलाय ‘ असे म्हणत विरोध केला होता याकडेही लक्ष वेधले . प्रशांत जगताप , कॉंग्रेसचे आबा बागुल , अविनाश बागवे यांच्यासह महाविकास आघाडीचा प्रथम पासून या विषयाला असलेला विरोध पाहता चव्हाण आणि काकडे यांची हि पत्रकार परिषद लक्षवेधी ठरली . विशेष म्हणजे चव्हाण यांनी हि पूर्वी या विषयाला कडाडून विरोध केला होता. मात्र भाजपा चे नेते गणेश बिडकर यांच्या शी चर्चा केल्यावर काही अटी शर्ती मान्य करवून आम्ही या विषयाला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याचे काकडे -चव्हाण यांनी म्हटले होते .
या पत्रकार परिषदेने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झाली . आणि ‘माय मराठी ‘ने राष्ट्रवादी पलटली, कॉंग्रेस संतापली ‘ च्या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले ज्याचा परिणाम व्हायचा तोच झाला . आणि आज सकाळी सकाली राष्ट्रवादी च्या नेत्यांना पूर्ववत भूमिका कायम असल्याचे जाहीर करावे लागले .
दरम्यान कॉंग्रेस ने , थोडे फार मतभेद होतात , पण आम्हाला महाविकास आघाडी शेवट पर्यंत टिकवायची आहे, भाजपाने दिशाभूल करवून राष्ट्रवादीला आमच्या पासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला असे सांगत आता नव्याने पूर्ववत भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या परतण्याचे स्वागत केले आहे.
हे ही वाचा …
हे ही वाचा …

