भाजपा कडून महापौरपदासाठी मुरलीधर मोहोळ उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल (व्हिडिओ)
पुणे- भाजपच्या वतीने महापौर पदासाठी नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची तर, उपमहापौर पदासाठी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले . महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मुरलीधर मोहोळ व सरस्वती शेंडगे यांची महापौर व उपमहापौर पदासाठी निवड केली आहे.
पुणे महापालिकेत भाजप, रिपाइं (आठवले गट) व मित्र पक्षाचे मिळून 99 नगरसेवक असून पूर्ण बहुमत असल्याने मोहोळ व शेंडगे यांचा विजय निश्चित होईल. अर्ज दाखल करताना खासदार संजय काकडे, शहर भाजपाच्या अध्यक्षा आ.माधुरी मिसाळ, मुरलीधर मोहोळ, सरस्वती शेंडगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, रिपाइंचे डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी मान्यवर व नगरसेवक उपस्थित होते.आमदार आणि विद्यमान महापौर मुक्ता टिळक तसेच खासदार गिरीश बापट काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगण्यात आले.