कंत्राटी कामगारांचे पैसे खाणारी महापालिका :आप च्या डॉ . मोरेंचा आरोप

Date:

मनपातील सर्व ७००० ते ८००० कंत्राटी कामगारांना नियमानुसार बोनस, रजा वेतन व घरभाडे भत्ता द्या – आपची मागणी

कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे २ महिन्यांचे थकलेले वेतन आज संध्याकाळ पर्यंत देणार – आपच्या शिष्ट मंडळाला आयुक्तांचे आश्वासन

प्रसादाची पर्वा न करता क्रिस्टल कंपनीचे लाड थांबवा, काळया यादीत टाका

पुणे – गेल्या वर्षभरापासून महापालिका आणि पीएमपीएमएल मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आम आदमी पार्टीने महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरु ठेवले असून या कंत्राटी कामगारांचे ७० ते ७५ कोटी रुपये महापालिकेने खाल्याचा आरोप प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी केला आहे . आज त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सुरक्षा रक्षकांचे पगार का नाहीत ? बोनस का नाहीत . असे सवाल केले .

पुणे महानगरपालिकेतील १६०० सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना त्यांचे थकलेले दोन महिन्यांचे वेतन तातडीने द्यावे तसेच पुणे मनपाच्या सेवेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED कंपनीवर दंडात्मक कारवाई करत काळया यादीत टाकावे यासाठी आज आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयात धडक भेट घेतली. या शिष्टमंडळाशी चर्चा करताना आयुक्तांनी आज संध्याकाळपर्यंत थकीत वेतन दिले जाईल असे आश्वासन आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.

पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील १६०० कंत्राटी सुरक्षारक्षकांचे ऑगस्ट, सप्टेंबर २०२२ या दोन महिन्यांचे वेतन क्रिस्टल कंपनीद्वारे थकीत झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहेत. कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न कामगारांपुढे आहे. दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्ष प्रश्न या कामगारांपुढे आहे. केलेल्या कामाचे वेतन न देणे हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ठेकेदाराने कामगारांचे वेतन दिले की नाही हे तपासणे आणि दिले नसल्यास त्यांना द्यायला लावणे व कामगार हिताच्या तरतुदीला हरताळ फासणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
भाजपचे विधान परिषदेतील सर्वात श्रीमंत आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर सत्ताधारी भाजप- शिंदे सरकारचा राजकीय वरदहस्त असल्याने तिच्या विरोधात अद्यापही कोणतीही प्रशासकीय व फौजदारी कारवाई होत नाही. तिचे लाड केले जात आहेत. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे असा अहवाल कामगार कल्याण विभाग व सुरक्षारक्षक विभागाने दिलेला आहे अशी आमची माहिती असून पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करत नाहीत.असे आरोप यावेळी करण्यात आले , याबाबत आयुक्तांनी कोणत्याही प्रसादाची पर्वा न करता लाड थांबवत या कंपनीला काळया यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी आपच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले.

पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये सुमारे सात ते आठ हजार कंत्राटी कामगार ठेकेदारांमार्फत काम करत आहेत. बोनस प्रधान अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांचे मूळ वेतन अधिक विशेष भत्ता मिळून येणारे रक्कम दरमहा रुपये 21000 पेक्षा कमी असल्यास आणि वर्षातील 30 दिवसांपेक्षा जास्त काळ कंत्राटी कामगारांची सेवा घेतली असल्यास त्याला मूळ वेतन अधिक विशेष भत्ता मिळून येणाऱ्या रकमेच्या 8.33% बोनस देणे बंधनकारक आहे. परंतु पुणे महानगरपालिका कामगार कायद्यांचे उल्लंघन करत 17 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यालयीन आदेश काढत कंत्राटी कामगारांना 8.33% बोनस, 5% घर भाडे व 5% रजावेतन देणे बंद केले आहे. हा आदेश कायद्याच्या कसोटीवर योग्य नाही हे आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. पुणे महानगरपालिकेतील कामगार विभाग अशा पद्धतीने कंत्राटी कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करत आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे केले जाणाऱ्या या शोषणाला कोणत्याही पद्धतीने कायद्याचा आधार नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे साधारणपणे सुमारे 4000 ते 4500 रुपयांचे दरमहा नुकसान होत आहे. अशा पद्धतीने गेल्या 22 महिन्यांमध्ये पुणे महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांचे सुमारे 70 ते 75 कोटी रुपये बुडवले आहेत. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वर्ष 2021 अगोदर पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगारांच्या वेतनासोबत वरील बोनस, घरभाडे व रजावेतन सुद्धा दिले जात होते. पुणे शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा कंत्राटी कामगारांना वर उल्लेख केल्याप्रमाणे बोनस, घरभाडे व रजावेतन दिले जात आहे. तरी पुण्यातही ते दिले जावे अशी मागणी आप तर्फे डॉ अभिजीत मोरे यांनी केली. बोनस मिळाला असता तर कंत्राटी कामगारांची दिवाळी देखील गोड झाली असती अशी गोष्टी आम आदमी पक्षाचे श्रीकांत आचार्य यांनी केली.

आजच्या शिष्टमंडळामध्ये राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, राज्य वाहतूक विंग अध्यक्ष श्रीकांत आचार्य, किरण कद्रे, किशोर मुजुमदार, फॅबियन सॅमसन, आबासाहेब कांबळे, साजिद खान, सुरेखा भोसले, निलेश वांजळे, अनिल कोंढाळकर हे उपस्थित होते. याशिवाय आपचे सुजित अगरवाल, संजय कोने, शेखर ढगे, सर्फराज शेख, तानाजी शेरखाने, हर्षल भोसले, रविराज डोंगरे, कुमार धोंगडे, शिवाजी डोलारे, संजय कटरनवरे यांसह अनेकजण उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...