पुणे – धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने अखेर पुणे महापालिका प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यापूर्वी प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.२४ तास पाणीपुरवठा करणार म्हणून २४ बाय ७ ची योजना राबविण्यासाठी गेली ६ वर्षे महापालिकेने करोंचा चुराडा केला आहे .अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या ..कित्येक ठिकाणी पाईपलाईन टाकल्याचे सांगण्यात आले पण यात निम्मे केले ,निम्मे जुनेच पण कागदावर नवे केले अशा पद्धतीने कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला . एकीकडे हा भ्रष्टाचार दुसरीकडे नागरिकांची खोटी आश्वासने देऊन फसवणूक ..पाणीपट्टी वाढीव दराने अगोदरच वसूल केली . आणि हे सारे करत असताना निसर्गाने भरभरून दिलेला दर वर्षाचा जलसाठा तो व्यवस्थित नियोजन पूर्वक वापरता आलेला नाही बरे यंदा गणपती विसर्जन देखील नाही . पाणी साठा मुबलक नव्हे भरभरून असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज गेल्या वर्षाच्या तुलनेत देखील अवघा २५ टक्के साठा उरला आहे .गेल्यावर्षी आजच्या दिवशी चारही धरणात मिळून ८. ६६ टीएमसी पाणी होते ते आज अवघे २.५३ टीएमसी आहे म्हणजे जाव्ल्जाव्ल ६ टीएमसी पाण्याचा अपव्यय कसा कोणी कुठे गेला हा हिशेब मागयला आता कोणीही पुढे येत नाही .महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याचा तर निव्वळ खाबुगीरीकडे आणि सहली, मौज मजा मारण्याकडे कल राहिला आहे त्याचा हा परिणाम दिसून येतो आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. पुण्याकडे व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही, चारही धरणात मिळून केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला तर स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याची तीन दिवसांपूर्वी बैठक होणार होती, पण ही बैठक रद्द झाल्याने निर्णय लांबणीवर पडला होता.
पुण्यात आधीच असमान पाणी पुरवठा होत आहे. सध्या काही भागात दिवसभर पाणी असते तर बहुतांश भागात दिवसातून एक वेळच पाणी मिळते. त्यामुळे तेथे पाणी कपात केली तर कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन नागरिकांना पाणीच मिळणार नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचे यापूर्वीच्या पाणी कपातीमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणी कपातीनंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणी कपात केली जाते. यंदाही पाणी कपात करण्याचा निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करणे सुरू केले आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीने नियोजन केले आहे याचा आढावा घेतला. पुण्यातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा पाहता पाणी कपात करताना एक दिवसाआड पाणी देणेच शक्य आहे. त्यामुळे त्याचे वेळापत्रक जाहीर करून सोमवारपासून अंमलबजावणी करावी अशी चर्चा बैठकीत झाली आहे.धरणातील पाणी साठा कमी झाला आहे, त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. सोमवारपासून पुण्यात पाणी कपात लागू होईल. त्याचे वेळापत्रक व इतर निर्णय आज अंतिम केले जाईल. पाऊस लांबणीवर पडल्याने महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागत आहे.असेही आयुक्तांनी म्हटलेले आहे.
शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असला तरी एकूण पाणी वापरता साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पाणी कपात केली जाईल. सध्या रोजचा पाण्याचा वापर १६५० एमएलडी इतका आहे. त्यात ३० टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज सरासरी १२०० एमएलडी पाणी वापर करावा लागणार आहे. त्याचा रोजचा ४५० एमएलडी वापर कमी होणार असला तरी काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

