मुमताझ पीरभॉय यांना पीएच.डी प्रदान
पुणे :
‘अंजूमन -ए- उर्दू हिंद,’ पुणे च्या अध्यक्ष मुमताझ पीरभॉय यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी प्रदान करण्यात आली. मुमताझ पीरभॉय यांना त्यांनी केलेल्या उर्दू साहित्यातील संशोधनाकरीता ही पीएच.डी देण्यात आली. श्रीमती पीरभॉय यांनी पंधराव्या शतकामधील ‘इब्न -ए-निशाती’ यांनी लिहिलेल्या ‘फूल बन’ महाकाव्यातील संशोधन केले. या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ. अझीज आंबेकर यांनी सहकार्य केले होते.