२ वर्षात मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करणार .. मग गेली अडीच वर्षे काय डोंगार,झाडी आणि हाटीलच काय ?

Date:

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. गेली अडीच वर्ष नगरविकास खात्याचे मंत्री असताना हे काम का केलं नाही? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.कि अडीच वर्षे केवळ डोंगार ,झाडी आणि हाटील च केलात ?असाही सवाल केला आहे.

“येत्या दोन वर्षात मुंबई शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करु अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण अडीच वर्ष नगरविकास विभागाचे मंत्री होतात. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका हे सर्व आपल्या अधिपत्याखाली काम करत होते. त्यावेळी मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त का नाही केले? हा प्रश्न मुंबईच्या नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे,” असं महेश तपासे म्हणाले आहेत.

“खड्डेमुक्तीची घोषणा करता याचा अर्थ असा आहे की, गेल्या अडीच वर्षामध्ये नगरविकास खात्याचे मंत्री होतात, त्या कार्यकाळामध्ये मुंबई शहरासाठी, रस्त्यांसाठी काही झालं नाही का? ही त्याची कबुली आहे का अशी विचारणा महाराष्ट्रातली जनता करत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबईतील रस्त्यांची कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आढावा घेतला. त्या वेळी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीक्षणाचा खर्चदेखील कमी होतो. त्यामुळे मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत. मुंबईत आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचेही टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे.

२०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे, तर आणखी ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणदेखील पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...